ETV Bharat / city

Sanjay Raut ED Custody : संजय राऊतांचा मुक्काम ईडी कोठडीत; मिळणार घरचे जेवण - Sanjay Raut in ED custody till August 4

संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांना विशेष पीएमएलए कोर्टाने 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. यावेळी त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत घरचे जेवण देण्याची न्यायालयाची परवानगी दिली आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात ( PMLA court) सुणावनी झाली.

Sanjay Raut
संजय राऊत
author img

By

Published : Aug 1, 2022, 7:05 PM IST

Updated : Aug 1, 2022, 7:30 PM IST

मुबंई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांना विशेष पीएमएलए कोर्टाने 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. यावेळी त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत घरचे जेवण देण्याची न्यायालयाची परवानगी दिली आहे. गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात ( PMLA court) सुणावनी झाली. संजय राऊत ( Sanjay Raut ) यांना अटक केल्यानंतर आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

सुनिल राऊत

जे जे रुग्णालयात वैद्यकीय चाचणी - संजय राऊत यांना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात येण्यापूर्वी त्यांची जे जे रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अडीचच्या सुमारास सत्र न्यायालयात पिढीचे हे घेऊन आले होते. तीन वाजता संजय राऊत यांच्या रिमांडवर न्यायमूर्ती देशपांडे यांच्यासमोर युक्तीवादाला सुरुवात झाली. त्यावेळी सर्वात प्रथम ईडीच्या वतीने हितेन वेणेगावकर यांनी युक्तिवाद सुरुवात केली. ईडीच्यावतीने न्यायालयासमोर सांगण्यात आले की, या प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्याकरिता फ्रंटमॅन म्हणून काम करायचे. तसेच संजय राऊत आणि या प्रकरणात 1 कोटी 20 लाख रुपयाचा लाभ घेतला आहे.

संबंधित साक्षीदार दबाव - यापूर्वी देखील संजय राऊत यांना ईडी अधिकाऱ्यांकडून तपासाकरिता तीन वेळा समन्स देण्यात आला होता. मात्र, संजय राऊत केवळ एकच वेळा उपस्थित राहिले होते. त्यामुळे या प्रकरणातील इतर संबंधित साक्षीदार यांच्यावर दबाव देखील आणण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला होता. या प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. यासंदर्भातील तक्रार देखील साक्षीदाराने संबंधित पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांची या प्रकरणात चौकशी होणे अतिशय महत्त्वाचे असल्याने त्यांना 8 दिवसाची ईडी कोठडी देण्यात यावी अशी मागणी देखील ईडीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती.

राजकीय वैमनस्यातून कारवाई - संजय राऊत यांचे वकिल अशोक मुंदरगी यांनी त्यांच्या युक्तीवादात असे म्हटले की, संजय राऊत यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही राजकीय वैमनस्यातून कारवाई करण्यात आली. संजय राऊत यांच्या विरोधात 112 कोटी रुपयांचा या प्रकरणात घोटाळा झाला असल्याचे ईडीने म्हटले आहे. वास्तविक ईडीकडून कुठलेही पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आलेले नाही. संजय राऊत हे राजकीय नेते आहे. त्यांनी रीतसर तपास यंत्रणा उपस्थित न राहण्याचे कारण देखील ईडी अधिकाऱ्यांना सांगितले होते. तसेच तपासा सहकार्य देखील करणार असे आश्वासन देखील दिले होते. संजय राऊतला ईडीने समान दिला त्यावेळी त्यांनी कोणत्या कारणामुळे सध्या चौकशीला येऊ शकत नाही. या संदर्भातील देखील माहिती ईडीला दिली होती. राज्यात, देशात महत्त्वपूर्ण निवडणुका पार पडत होत्या. त्या दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांकडून संजय राऊत यांना समान भजनात आले होते. एका पक्षाचे महत्त्वपूर्ण नेते असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात जबाबदारी होती त्यामुळे ते त्यावेळी तपासाला जाऊ शकले नव्हते. मात्र वेळ मिळाला त्यावेळी त्यांनी ईडी कार्यालयात जाऊन चौकशीला सहकार्य देखील केल्या होते असे देखील संजय राऊत यांच्या वकिलांनी युक्तीवाला दरम्यान कोर्टासमोर म्हटले आहे.

हेही वाचा - Uddhav Thackeray : 'संजय राऊत खरे पुष्पा, झुकेगा नहीं...'; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

ठराविक वेळेपर्यंत चौकशी करा - संजय राऊत यांच्या वकिलांकडून कोर्टासमोर दोन अर्ज सादर करण्यात आले होते. अॅड. अशोक मुंदरगी यांनी म्हटले आहे की, संजय राऊत यांची हृदयाचे ऑपरेशन झालेले आहे. त्यामुळे त्यांना रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी करण्यात येऊ नये. काही ठराविक वेळेपर्यंतच त्यांची चौकशी करण्यात यावी. तर, संजय राऊत यांना घरचे जेवण, वकिलांना भेटण्याची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी देखील यावेळी अर्जाद्वारे संजय राऊत यांच्या वकिलांकडून करण्यात आली आहे. या सर्व अर्जाला न्यायालयाने मंजुरी दिली असून ईडीला म्हटले आहे की, तुम्ही ठराविक वेळेपर्यंत संजय राऊत यांची चौकशी करा. या संदर्भातील एक टाइम टेबल देखील बनवण्याचे निर्देश न्यायालयाने ईडी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

न्यायालयावर विश्वास - संजय राऊत यांना काल रात्री अटक करण्यात आली आहे. आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे ईडीच्या अधिकाऱ्यांकडून संजय राऊत यांची आठ दिवसाची कस्टडी मागण्यात आली. होती मात्र, न्यायालयाने इतक्या दिवस कस्टडीची गरज नसल्याचे सांगत चार ऑगस्टपर्यंत कोठडी दिली आहे. आम्हाला विश्वास आहे की, संजय राऊत लवकरच बाहेर येईल असे, आमदार सुनील राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

4 ऑगस्टपर्यंत कोठडी - शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांना विशेष पीएमएलए कोर्टाने 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. त्यांना चार दिवस ईडीच्या रहावं लागणार आहे. गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात ( PMLA court) सुणावनी झाली. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. ईडीच्या वतीने सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तीवाद केला आहे. संजय राऊत यांना 4 वेळा समन्स बजावण्यात आले होते. मात्र, ते फक्त एकदाच एजन्सीसमोर हजर झाले. यादरम्यान संजय राऊत यांनी पुरावे, साक्षीदारांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला असे ईडीच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला. यावेळी सजंय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.

8 दिवसांच्या कोठडीची मागणी - ईडीने संजय राऊतच्या 8 दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहेदरम्यान, संजय राऊत ( Sanjay Raut ) यांना ईडी अधिकाऱ्यांनी जे जे रुग्णालयात वैद्यकीय चाचणीनंतर कोर्टात हजर केले. रविवारी पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणी सेना नेते खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या 10 अधिकाऱ्यांनी नऊ तास चौकशी केली. त्यानंतर पुढील चौकशीसाठी त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात सांयकाळी नेले. तेथेही तब्बल सहा तास चौकशी केल्यावर रात्री उशिरा 12 वाजून 30 मिनिटांनी त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली. ही अटक 31 ऑगस्ट 2022 रोजी मध्यरात्री झाली.

हेही वाचा - Eknath Shinde: आता आठ वाजताचा भोंगा बंद झाला, मुख्यमंत्र्यांची राऊतांच्या अटकेवर मिश्किल टिप्पणी

Last Updated : Aug 1, 2022, 7:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.