मुंबई - पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी प्रकरणी ईडीने अटक केल्यानंतर आर्थर तुरुंगात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना तुरुंग प्रशासनाने दहा बाय दहाची स्वतंत्र बॅरेक दिली आहे त्यात स्वतंत्र शौचालय आणि स्नानगृहही आहे त्यांना एक बेड आणि पंखाही देण्यात आलेला आहे सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना वेगळ्या बराकीत ठेवण्यात आले आहे इतकेच नव्हे तर त्यांच्या बॅरेकभोवतीही तगडी सुरक्षा व्यवस्था आहे दरम्यान राऊत यांचा कैदी क्रमांक 8 हजार नऊशे 59 हा आहे संजय राऊतांचे कारागृहात वाचन लिखाण सुरू असते
अनेक पुस्तकांची मागणी केली होती संजय राऊत यांनी कारागृह प्रशासनाकडे वही आणि पेनची मागणी केली होती ती मंजूर झाली आणि आता ते दिवसभरात सतत काहीतरी लिहित असतात तसेच त्यांनी अनेक पुस्तकांची मागणी केली होती जी त्यांना तुरुंगातील ग्रंथालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहेत आता दिवसभर ते एकतर लिहित असतात किंवा पुस्तके वाचत असतात संजय राऊत यांना कुटुंबियांशिवाय कोणालाही भेटण्याची परवानगी नाही तुरुंगाच्या नियमांनुसार केवळ कुटुंबातील सदस्यच त्यांना भेटू शकतात नुकतेच एक खासदार आणि दोन आमदार राऊत यांना भेटायला गेले होते मात्र तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटू दिले नाही तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना घरचे जेवण व औषधे दिली जात आहेत
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अंमलबजावणी संचालनालयाने ईडी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केल्यानंतर आठ दिवसांनी सोमवारी विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांना 22 ऑगस्टपर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली पीएमएलए न्यायालयाचे विशेष न्या एम जी देशपांडे यांनी राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावली त्यावेळी ईडीने न्यायालयाला सांगितले की त्यांना 1,034 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी अतिरिक्त कोठडीची आवश्यकता नाही
हेही वाचा - Vinayak Mete Funeral विनायक मेटेंवर सोमवारी बीड येथे होणार अंत्यसंस्कार