ETV Bharat / city

शिवतीर्थावरचा कालचा भोंगा हा भारतीय जनता पक्षाचा होता - खासदार संजय राऊत

काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवाजी पार्कच्या सभेमध्ये महाविकास आघाडी सरकारवर, विशेष करून शिवसेनेवर घणाघात केला. याला उत्तर देताना आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Sanjay Raut criticize Raj Thackeray
संजय राऊत
author img

By

Published : Apr 3, 2022, 10:53 AM IST

Updated : Apr 3, 2022, 10:59 AM IST

मुंबई - काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवाजी पार्कच्या सभेमध्ये महाविकास आघाडी सरकारवर, विशेष करून शिवसेनेवर घणाघात केला. याला उत्तर देताना आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

हेही वाचा - Gudi Padwa Rally Mallakhamb : गिरगावातील शोभायात्रेत मल्लखांबावर चिमुकल्यांचे चित्तथरारक सादरीकरण

काय म्हणाले राऊत? : काल विविध कामांचे लोकार्पण झाले, त्यावर काही बोलले नाहीत. मुख्यमंत्री काम करत आहेत त्यावर बोला. भाजप व शिवसेनेचे आम्ही बघू, असे सांगत जनता राज ठाकरे यांना प्रतिसाद देत नाही, यावर इतरांना बोलण्याची गरज नाही, असे संजय राऊत म्हणाले. शिवतीर्थावरचा कालचा भोंगा हा भारतीय जनता पक्षाचा होता, असे सांगत काल एकच समजले काहींना अक्कलदाढ उशिरा येते. मनसे ही भाजपची सी टीम आहे. फक्त नकला करून मते मिळत नाहीत. आम्हाला याच्यावर लक्ष द्यायचे नाही. राज्यात अनेक संकटे आहेत. त्याविषयी लढा द्यायचा आहे. कालच्या टाळ्या या स्पॉन्सर होत्या, असे संजय राऊत म्हणाले.

किती भाजपशासित राज्यांनी भोंगे बंद केले? : कालची सभा ही भाजपची सभा होती. किती भाजपशासित राज्यांमध्ये भोंगे बंद केले आहेत, असा प्रश्नही राऊत यांनी याप्रसंगी उपस्थित केला. जे कायद्याने काम करायचे ते कायदा करील. गृहमंत्री करतील, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे हे देशातले मोठे नेते आहेत व ते नेहमी मोठेच राहणार. प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. कालचे मराठी भाषा भवन, मेट्रोचे चे विकास काम ते त्यांना दिसत नाही, असे सांगत आपल्या नजरेसमोर जे होत आहे ते अगोदर बघा नंतर तुमच्या दिव्य दृष्टीने दुसरे बघा, असेही राऊत म्हणाले.

हेही वाचा - Fraud With Rajkumar Rao : राजकुमार रावच्या पॅनकार्डचा वापर करुन 'इतक्या' रुपयांची फसवणूक

Last Updated : Apr 3, 2022, 10:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.