ETV Bharat / city

एकनाथ शिंदे हे आमचे सहकारी, आम्ही त्यांची वाट पाहत आहोत, ते परत येतील - संजय राऊत - shiv sena rebel eknath shinde

एकनाथ शिंदे आमचे सहकारी आहेत. आम्ही त्यांची वाट पाहत आहोत. एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह परत येतील, अशी आपल्याला खात्री असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक सायंकाळी वर्षा निवासस्थानी बोलावली होती.

Sanjay Raut on eknath shinde
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
author img

By

Published : Jun 22, 2022, 6:46 AM IST

मुंबई - एकनाथ शिंदे आमचे सहकारी आहेत. आम्ही त्यांची वाट पाहत आहोत. एकनाथ शिंदे ( Sanjay Raut on eknath shinde ) सर्व आमदारांसह परत येतील, अशी आपल्याला खात्री असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut on eknath shinde ) म्हणाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक सायंकाळी वर्षा निवासस्थानी बोलावली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना साद घातली आहे.

हेही वाचा - बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आम्ही सोडलेली नाही आणि सोडणार नाही : एकनाथ शिंदे

विधानसभेत जेव्हा बहुमतासाठी आकडे मोजण्याची वेळ येईल तेव्हा आकडे मोजण्यात यावेत. आम्ही बहुमत सिद्ध करू. जे आमदार नियम पाळणार नाही त्यांची आमदारकी रद्द होईल, असा इशाराही प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी बंडखोर आमदार आणि एकनाथ शिंदे यांना दिला आहे. तसेच, सुरतला गेलेल्या आमदारांपैकी काही आमदारांना परत यायचे आहे. मात्र, मुंबईतले गुंड सुरतला जाऊन त्या आमदारांना परत येऊ देत नाहीत, असा आरोप संजय राऊत यांनी नाव न घेता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर केला आहे.

आमदारांचे अपहरण केल्याचा आरोप - काही आमदारांचे अपहरण केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या अपहरणाबाबतची तक्रार देखील त्यांच्या पत्नीने पोलिसांमध्ये दाखल केली आहे. तसेच, या आमदारांना गुजरात पोलीस आणि गुंडांनी जबर मारहाण केली असल्याचाही आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा - Political Crises In Maharashtra : बंडखोर आमदारांना सुरतहुन विमानाने हलवले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.