ETV Bharat / city

Sanjay Raut on Shivsena claim : शिवसेना कोणाची? यासाठी आमच्याकडे कसले पुरावे मागताय? - संजय राऊत - शिवसेना दावा निवडणूक आयोग भूमिका

शिवसेना आपली असल्याचा दावा करत एकनाथ शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला ( Sanjay Raut on EC ) पत्र दिला आहे. या पत्राची दखल घेत दोन्ही ( Sanjay Raut on Shinde group Shiv Sena claim ) पक्षाला 8 ऑगस्ट पर्यंत कागदपत्रांसहित पुरावे सादर करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या आदेशानंतर शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut on shiv sena claim ) हे चांगले संतापले

Sanjay Raut comment on Eknath Shinde
संजय राऊत
author img

By

Published : Jul 23, 2022, 12:30 PM IST

मुंबई - शिवसेना आपली असल्याचा दावा करत एकनाथ शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला ( Sanjay Raut on EC ) पत्र दिला आहे. या पत्राची दखल घेत दोन्ही पक्षाला 8 ऑगस्ट पर्यंत कागदपत्रांसहित पुरावे सादर करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने ( Sanjay Raut on Shinde group Shiv Sena claim ) दिले आहेत. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या आदेशानंतर शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut on shiv sena claim ) हे चांगले संतापले असून, शिवसेना कोणाची यासाठी आमच्याकडेच कसली पुरावे मागत आहात? आज पर्यंत महाराष्ट्रासाठी हजारो शिवसैनिक शहीद झाले. ही वेळ बंडखोरीमुळे आली असून राज्यातील अकरा कोटी जनता हे उघड्या डोळ्यांनी बघत आहे. जे शिवसेना मधून फुटले आहेत त्यांनी त्यांचा वेगळा पक्ष स्थापन करावा त्याचे आनंदात राहावे असा टोला एकनाथ शिंदे गटाला संजय राऊत यांनी आज आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून लगावला आहे.

हेही वाचा - Phone Tapping Case Handed Over To CBI : शिंदे फडणवीस सरकारचा ठाकरेंना पुन्हा धक्का या दोन प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग

शिवसेना कोणाची? हे राज्यातील अकरा कोटी जनतेला माहीत आहे. 1992 च्या दंगलीमध्ये शिवसैनिकांवर अनेक गुन्हे दाखल झाले. सीमा प्रश्नासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरला. शिवसेनेतून केवळ दहा ते वीस लोक फोडली म्हणून शिवसेना फुटली असे होत नाही. या सर्वांच्या मागे भारतीय जनता पक्ष आहे. महाराष्ट्र द्वेषींनी महाराष्ट्रावर ही वेळ आणली आहे. शिवसेनेतील लोकांचा वापर केला जातो हे दुर्दैवी आहे. मात्र, जी लोक आज सत्तेच्या घोड्यावर बसले आहेत. त्यांची गाढवावरून जनता धिंड काढेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

लोकसभा अध्यक्षांकडून बंडखोरांना तात्काळ उत्तर - शिवसेना गटप्रमुख विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्ष यांना पत्र लिहिले होते. या पत्राच्या माध्यमातून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना लोकसभा अध्यक्षांनी उत्तर दिले नाही, मात्र बंडखोर खासदारांनी अध्यक्षांना गटनेते बद्दल लिहिलेल्या पत्राला 24 तासांच्या आत उत्तर देण्यात आले. अशाप्रकारे सत्याचा खून होत असेल तर आमच्याकडे पुरावे मागितले जात आहे असा टोलाही लोकसभा अध्यक्षांना संजय राऊत यांनी लगावला.

वासू - सपनाचे सरकार - जवळपास एक महिना होत आला असला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेच निर्णय घेत आहेत. हे सरकार म्हणजे वासू - स्वप्नाचे सरकार आहे. बेकायदेशीररित्या राज्याचे मोठे मोठे निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

उठाव मधला उठा हा उद्धव ठाकरेंचा - हे बंड नाही तर उठाव आहे, असे सातत्याने बंडखोर आमदारांकडून सांगितले जाते. मात्र, उठाव शब्दांमधील पहिली दोन अक्षरे उ आणि ठा आहेत. आणि उद्धव ठाकरे या बंडखोरांना उठवल्याशिवाय राहणार नाहीत. तसेच, महाराष्ट्राच्या जनतेचा आदित्य ठाकरे यांच्या यात्रेला प्रतिसाद मिळत आहे. ही पैसे देऊन आणलेली लोक नाहीत. हे महाराष्ट्रावर आणि बाळासाहेबांवर प्रेम करणारी जनता असल्याचेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच आयोध्या दौऱ्याला जातील अशी चर्चा आहे. मात्र, गेल्या महिन्यातच एकनाथ शिंदे आपल्यासोबत आयोध्या दौऱ्याला आले होते. तिथे त्यांनी मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चा केली. मात्र, आता ते पुन्हा आयोध्येला काय? तर, वाराणसी आणि काशी लाही जातील, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.

हेही वाचा - Coronavirus New Cases Today : देशात 24 तासात 20557 कोरोना रुग्णांची नोंद, तर 40 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.