ETV Bharat / city

संजय राऊत यांनी अलिबागची जमीन राजकीय दबावाने कमी किमतीत घेतली, स्वप्ना पाटकर यांचा ईडीला जबाब

संजय राऊत यांनी अलिबाग येथील समुद्रकिनाऱ्याजवळील जमीनी घेताना राजकीय दबाव वापरला. या जमिनीचा बाजारभाव अंदाजे नऊ ते दहा कोटी रुपये इतका आहे. मात्र संजय राऊत यांच्यात दबावामुळे त्या 51 लाख रुपयांमध्ये खरेदी करण्यात आल्या होत्या, असे स्वप्न पाटकर यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे (Swapna Patkar statement to ED).

author img

By

Published : Sep 20, 2022, 10:27 PM IST

स्वप्ना पाटकर यांचा ईडीला जबाब
स्वप्ना पाटकर यांचा ईडीला जबाब

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांनी अलिबाग येथील समुद्रकिनाऱ्याजवळील जमीनी घेताना राजकीय दबाव वापरला. अनेक जमिनी त्यांनी विकत घेतल्या आहेत. तसेच वास्तविक किमतीपेक्षा कमी किंमत दाखवून खरेदी करून घेतल्या. तसेच उर्वरित रक्कमही रोख दिली होती, असा जबाब स्वप्ना पाटकर यांनी ईडीला दिला आहे. पत्रा चाळ प्रकरणात ईडीने स्वप्ना पाटकर यांचा जबाब घेतला होता.

कमी बाजार मूल्य दाखवून खरेदी - स्वप्ना पाटकर यांनी ईडीला दिलेल्या जबाब असे म्हटले आहे की 2010 ते 2012 या कालावधीमध्ये स्वप्ना पाटकर आणि वर्षा राऊत यांच्या नावावर या कालावधीत एकूण आठ मालमत्ता विकत घेण्यात आल्या होत्या. या जमिनी वेगवेगळ्या मालकांकडून खरेदी केल्या गेल्या. या जमिनी अलिबागच्या समुद्रकिनाऱ्याच्या जवळ आहेत. या जमिनी विकत घेताना संजय राऊत यांनी त्यांचे राजकीय वजन वापरून कमी पैशात आणि खरेदीच्यावेळी कमी बाजार मूल्य दाखवून खरेदी केल्या. खरेदी झाल्यानंतर या सर्व मालकांना रोख रक्कमेनुसार पैसे देखील देण्यात आले होते. या जमिनीचा बाजारभाव अंदाजे नऊ ते दहा कोटी रुपये इतका आहे. मात्र संजय राऊत यांच्यात दबावामुळे त्या 51 लाख रुपयांमध्ये खरेदी करण्यात आल्या होत्या, असे स्वप्न पाटकर यांनी म्हटले आहे.

जमिनी बेहिशोबी पैशातून खरेदी - संजय राऊत यांच्या कुटुंबीयांनी अनेक ठिकाणी जमिनी लोकांकडून खरेदी केलेल्या आहेत. या जमिनी बेहिशोबी पैशातून खरेदी केल्यात. संजय राऊत यांनी अनेक जणांकडून कर्ज घेतलेले आहे हे कर्ज त्यांनी सहकारी आणि नातेवाईक आई, भाऊ, चुलत भाऊ अशा लोकांकडून घेतले आहे की त्यांचे आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत कोणताही नाहीत. संजय राऊत यांनी पत्राचाळीच्या पुनर्विकासासारख्या अनेक प्रकल्पामध्ये बेकायदेशीररित्या कमाईतून आलेले पैसे लावण्यात आले. एचडीआयएल आणि तत्सम पुनर्विकास प्रकल्पांमार्फत गोरेगाव प्रकल्प येथे पत्राचाळ आपल्या राजकीय पदाचा वापर केला आहे, असेही जबाबात म्हटले आहे.

शरद पवार यांच्याशी संपर्क - 2008-09 दरम्यान पत्राचाळ येथील रहिवाशांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधला. त्याचबरोबर पत्रा चाळच्या पुनर्विकासासाठी विविध बैठका झाल्या. त्यानंतर एचडीआयएलचे राकेश वाधवान यांच्यासह प्रवीण राऊत यांना प्रकल्प हाताळण्यास सांगण्यात आले होते, असेही स्वप्ना पाटकर यांनी म्हटले आहे. पत्राचाळ प्रकल्प संजय राऊत एक हाती हाताळत होते. प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून हा प्रकल्प संपूर्ण संजय राऊतच पाहत होते. प्रवीण राऊत संजय राऊत यांना दर महिन्याला दोन लाख रुपये देत होते. एचडीआयएलकडून मिळालेल्या पैशातून प्रवीण राऊत हे संजय राऊत यांना पैसे देत होते असेदेखील स्वप्ना पाटकर यांनी म्हटले आहे.

तसेच 2010 ते 2015 या कालावधीमध्ये संजय राऊत प्रवीण राऊत आणि पाटकर कुटुंबीयांनी चीन जयपूर आणि गोवा या ठिकाणी फिरायला गेले होते. हा संपूर्ण खर्च प्रवीण राऊत यांनी केला होता. प्रवीण राऊत यांनी हा सर्व खर्च त्यांना मिळालेल्या प्रकल्पामधील पैशातून केला होता, असा दावा देखील स्वप्ना पाटकर यांनी जबाबामध्ये केला आहे. 2020 ते 2021 दरम्यान संजय राऊत कुटुंबीय रशियाला गेले होते. हा सर्व खर्च प्रवीण राऊत यांनी ट्रॅव्हल एजंटच्या मार्फत स्वतः केला होता असेही त्या म्हणाल्यात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.