ETV Bharat / city

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : पैशांची मागणी झाल्याचा संजय राऊतांचा ट्विटरवरून आरोप - aryan khan drug case

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ड्रग्स प्रकरणी पैशांची मागणी झाल्याचे गंभीर आरोप केले आहे. त्यांनी ट्वीट करून आर्यन खान प्रकरणातील साक्षीदारांना एनसीबीने कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करायला लावणे धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.

sanjay raut
sanjay raut
author img

By

Published : Oct 24, 2021, 1:00 PM IST

Updated : Oct 24, 2021, 3:23 PM IST

मुंबई - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आता मोठा खुलासा होत आहे. आर्यन खानला सोडण्यासाठी पैशाची मागणी केली गेल्याची माहिती मिळत आहे. हा मोठा खुलासा केला आहे किरण गोसावी यांचा सुरक्षारक्षक प्रभाकर साईल हे या प्रकरणातील पंच असून आर्यनला सोडण्यासाठी मध्यस्थांमार्फत 25 कोटी रुपये मागितल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच समीर वानखेडे यांनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एनसीबीवर आणि त्यांच्या या कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह यापूर्वीच उपस्थित झाले होते. ते आता या खुलाशानंतर अधिकच गडद झाले आहेत. या खुलाशानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.

काय म्हटले संजय राऊत

संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले की, एनसीबीकडून साक्षीदार असलेल्या व्यक्तीची एका कोऱ्या कागदावर सही घेतल्याचा प्रकार धक्कादायक आहे. तसेच आर्यनला सोडण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केल्याची देखील माहिती मिळत आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यांचे हे म्हणणे खरे ठरत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी या प्रकाराची स्वत:हून दखल घेतली पाहिजे, असे म्हणत त्यांनी दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्र्यांना ट्विट टॅग केले आहे.

आर्यन खान प्रकरणी नवा खुलासा

या प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीचा सुरक्षारक्षक असलेल्या प्रभाकर साईल नावाच्या व्यक्तीने एक खळबळजनक खुलासा केला आहे. त्याने म्हटले की, गोसावीच्या सांगण्यावरुनच तो पिवळ्या गेटजवळ गेला होता. समीर वानखेडे यांना 8 कोटी रुपये द्यायचे आहेत, असे म्हणताना त्याने ऐकल्याचा दावा केला आहे. एनसीबीने त्यांना साक्षीदार बनवून 10 कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. तसेच पैशांनी भरलेल्या बॅगेचा उल्लेखही केला असल्याचा खुलासा त्याने केला आहे. समीर वानखेडे आणि किरण गोसावी यांच्यावर त्याने वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा - Aryan Khan Case -आर्यनच्या सुटकेसाठी 25 कोटींचा सौदा, ड्रग्ज पार्टी प्रकरणातील 'पंच'चा गौप्यस्फोट

Last Updated : Oct 24, 2021, 3:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.