मुंबई - उद्धव ठाकरे यांना एकटे पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा दूरूपयोग सध्या भाजपकडून करण्यात येत आहे. परंतु, भाजपने कितीही त्रास दिला तरी संजय राऊत हे शिवसेनेला सोडणार नाहीत. ( Patra Chawl Case ) आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे संजय राऊत लवकरच बाहेर येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. उद्या गुरुवार (दि. 3 ऑगस्ट)रोजी राऊत यांची कोठडी संपणार आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
संजय राऊत यांना ईडीने रविवारी मध्यरात्री अटक - संजय राऊत यांना आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी रेगुलर वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तपासणी केल्यानंतर त्यांना पुन्हा ईडी कार्यालयात आणण्यात आले आहे. संजय राऊत यांना ईडीने रविवारी मध्यरात्री अटक केल्यानंतर त्यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये सोमवारी हजर करण्यात आले होते, त्यावेळी त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कस्टडीत रवानगी करण्यात आले होते. सध्या अधिकाऱ्यांकडून संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे.
काय आहे पत्राचाळ घोटाळा? - मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा म्हाडा भूखंड आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. पत्राचाळमध्ये राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली. तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. ही चाळ विकसित करण्याचे कत्रांट महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिले होते.
कंपनीने चाळीतील लोकांसाठी फ्लॅट बांधले - गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन 3 हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती. हे फ्लॅट 47 एकर जागेवर बांधले जाणार होते. मात्र, गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने तसे केले नाही. कंपनीने चाळीतील लोकांसाठी फ्लॅट बांधले नाहीत किंवा एमएचडीएला फ्लॅटही दिला नाही. कंपनीने ही जमीन अन्य आठ बिल्डरांना 1,034 कोटी रुपयांना विकली. हे दोन्ही घोटाळे करणाऱ्या एचडीआयएलचे संचालक प्रवीण राऊत, सारंग वाधवान, राकेश वाधवन आहेत.
अलिबागमध्ये जमीन खरेदी केली - ईडीने प्रवीणला पकडले तेव्हा संजय राऊतचे नाव समोर आले. प्रवीण हा शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मित्र आहे. प्रवीणच्या पत्नीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 83 लाखांचे कर्जही दिले होते. ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. तपास सुरू झाल्यावर वर्षा यांनी प्रवीणच्या पत्नीला 55 लाख रुपये परत केले. या प्रकरणातील आणखी एक आरोपी सुजित पाटकर याचाही संजय राऊतशी संबंध आहे. सुजित हा संजय यांच्या मुलीच्या फर्ममध्ये भागीदार आहे. सुजितची पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने मिळून अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. ही जमीनही घोटाळ्याच्या पैशातून घेण्यात आली होती.
हेही वाचा - महाराष्ट्रा शिवाय 'या; राज्यातही होते बिन मंत्रीमंडळाचे सरकार; पहा कोणत्या राज्यात किती दिवस होते असे सरकार