ETV Bharat / city

Sandalwood smuggling : चंदन तस्कर बादशाह मलिक 15 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

author img

By

Published : Jan 3, 2022, 9:31 PM IST

देशातला मोठा चंदन तस्कर म्हणून ओळख असलेल्या बादशाह मलिकला ईडीने अटक केली होती. कुर्ला येथील त्याच्या घरावर इडीने छापा मारला होता. चौकशीसाठी ताब्यात घेऊन 20 डिसेंबर रोजी रात्री त्याला अटक करण्यात आली होती.आज न्यायालयासमोर हजर केले असता बादशाह मलिकची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश PMLA कोर्टाने दिले आहेत.

Badshah Malik r
Badshah Malik r

मुंबई - देशातला मोठा चंदन तस्कर म्हणून ओळख असलेल्या बादशाह मलिकला ईडीने अटक केली होती. कुर्ला येथील त्याच्या घरावर इडीने छापा मारला होता. चौकशीसाठी ताब्यात घेऊन 20 डिसेंबर रोजी रात्री त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. आज सोमवार (दि 03) जानेवारी रोजी न्यायालयासमोर हजर केले असता बादशाह मलिकची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश PMLA कोर्टाने दिले आहेत.

15 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी -

बादशाह मलिक हा अंडरवर्ल्डसोबत मिळून जगभरात लाल चंदनाची तस्करी करत असल्याची माहिती आहे. चंदन तस्करीच्या 2015 सालच्या प्रकरणाशी संबंधीत ही कारवाई असल्याचे बोलले जात आहे. 2015 मध्ये डिआरआयने एक रॅकेट उद्ध्वस्त केले होते. ज्यात अतिशय दुर्मिळ आणि महाग असलेले लाल चंदन तस्करी करुन परदेशात पाठवण्यात येत होते.

मुंबईच्या एका शिपींग कंपनीच्या माध्यमातून जवळपास 8000 मेट्रीक टनाहून अधिक लाल चंदनाची तस्करी करण्यात येत होती. त्याची तेव्हाची किंमत 3 कोटींपेक्षा जास्त होती. डिआरआयनं न्हावाशेवा बंदरावर कंटेनरला रोखून ही तस्करी थांबवली होती. यातच बादशाह मलिक आणि विजय पुजारीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याआधी दोन वेळा बादशाह मलिकला अटक करण्यात आली होती. पण काही दिवसांतच तो जामिनावर बाहेर येऊन पुन्हा तस्करीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याला पुन्हा ईडीने अटक केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.