ETV Bharat / city

आज मुंबईत शहीद किसान यात्रा, तर उद्या महापंचायत; कॉ. प्रकाश रेड्डी यांची माहिती - संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा

मुंबईत आज संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, महाराष्ट्र यांच्यावतीने शहीद किसान कलश यात्रा (Shahid Kisan Kalash Yatra) काढण्यात आली. तर उद्या (28 नोव्हेंबर) आझाद मैदानात महापंचायत (Mahapanchayat) आयोजित करण्यात आल्याची माहिती कॉम्रेड प्रकाश रेड्डी (Prakash Reddy) यांनी दिली.

Shahid Kisan Kalash Yatra
शहीद किसान कलश यात्रा
author img

By

Published : Nov 27, 2021, 4:43 PM IST

Updated : Nov 27, 2021, 5:26 PM IST

मुंबई - शेतकरी कायदे, कामगार कायद्यांमध्ये करण्यात आलेले बदल परत घ्यावेत, तसेच आंदोलनादरम्यान शहीद झालेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत आज संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, महाराष्ट्र यांच्यावतीने शहीद किसान कलश यात्रा (Shahid Kisan Kalash Yatra) काढण्यात आली. तर उद्या (28 नोव्हेंबर) आझाद मैदानात महापंचायत (Mahapanchayat) आयोजित करण्यात आल्याची माहिती कॉम्रेड प्रकाश रेड्डी (Prakash Reddy) यांनी 'ई टीव्ही भारत'ला दिली.

प्रतिनिघींनी कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांच्यासोबत साधलेला संवाद
  • शेतकरी, कामगार विरोधी कायदे रद्द करा -

केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी विरोधी कायदे केल्याने दिल्लीच्या सीमेवर गेले कित्येक महिने शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान ७५० हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. याच दरम्यान केंद्र सरकारच्या एका मंत्र्यांच्या मुलाने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर गाडी घालून आंदोलकर्त्याना चिरडून मारले. यामुळे देशभरात सरकारविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. त्याची दखल घेत शेतकरी विरोधी तिनही कायदे मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मात्र, त्यावर आमचा विश्वास नाही. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी कायदे त्वरित मागे घेतले पाहिजेत. या मागणीसाठी आणि शहीद शेतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी शहीद किसान कलश यात्रा काढण्यात आली आहे. मुंबईत मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ ही यात्रा संपणार आहे. त्यानंतर उद्या रविवारी आझाद मैदानात महापंचायत आयोजित करण्यात आल्याची माहिती रेड्डी यांनी दिली.

  • उद्या महापंचायत -

संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, महाराष्ट्र यांच्यावतीने आज २७ नोव्हेंबर रोजी शहीद किसान कलश यात्रा शिवाजी पार्क ते चैत्यभूमी, टिळक ब्रिज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड, परळ नाका, लेफ्ट टर्न ते बाबू गेनू पुतळा, केईएम रस्त्याने सरळ ग्रेट मराठा कॉर्नरवरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड, भायखळा फ्लाय ओव्हरपासून सरळ जेजे फ्लाय ओवरवरून सरळ रीगल सिनेमा, मंत्रालय गांधी पुतळा येथे समारोप होईल. उद्या (२८ नोव्हेंबर) आझाद मैदानात विराट शेतकरी कामगार महापंचायत आयोजित केली आहे. सायंकाळी ४:३० वाजता हुतात्मा चौक व ५:३० वाजता गेटवे ऑफ इंडियावर अरबी समुद्रात अस्थिकलशांचे विसर्जन केले जाईल, अशी माहिती रेड्डी यांनी दिली.

Last Updated : Nov 27, 2021, 5:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.