ETV Bharat / city

समृद्धी महामार्ग आणि मेट्रोला कोरोना-लॉकडाऊनचा फटका, शुभारंभाचा 1 मेचा मुहूर्त चुकला - Mumbai Latest News

समृद्धी महामार्ग आणि मेट्रोला कोरोना-लॉकडाऊनचा फटका बसला आहे. यामुळे या दोन्ही कामांच्या शुभारंभाचा १ मेचा मुहूर्त चुकनार आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Apr 24, 2021, 5:04 PM IST

मुंबई - मुंबई ते नागपूर हे 701 किमीचे अंतर केवळ 8 तासांत पार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)कडून नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग बांधण्यात येत आहे. या प्रकल्पातील नागपूर ते शिर्डी हा 520 किमीचा टप्पा येत्या 1 मेला सेवेत दाखल होणार होता. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊनचा मोठा फटका या प्रकल्पाला बसला आहे. मजुरांची कमतरता आणि इतर बाबीमुळे काम संथगतीने सुरू असल्याने आता 1 मेला हा टप्पा सेवेत दाखल होणार नसून आता आणखी काही महिने या मार्गावरून प्रवास करण्यासाठी नागरिकांना वाट पाहावी लागणार आहे. दुसरीकडे मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7मधून 1 मेपासून प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्नही आता कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लांबले आहे. या प्रकल्पाचे काम ही संथ गतीने सुरू असून आता काम पूर्ण होण्यास किती वेळ लागेल हे आताच सांगता येणार नसल्याचे म्हणत या मेट्रो प्रकल्पाला मोठा फटका लॉकडाऊनचा बसत असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ने स्पष्ट केले आहे.

समृद्धीला गेल्या वर्षी ही कोरोनाचा फटका -

701 किमीच्या समृद्धी महामार्गाच्या कामाला 2017मध्ये सुरुवात करण्यात आली आहे. तीन टप्प्यात हा महामार्ग पूर्ण करण्यात येणार आहे. राज्य सरकारसाठी हा महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर हा प्रकल्प पूर्ण करण्याचा एमएसआरडीसीचा मानस आहे. मात्र, गेल्या वर्षी मार्चमध्ये देशात लॉकडाऊन लागला. समृद्धी प्रकल्पात काम करणारे अनेक परप्रांतीय मजूर कोरोना आणि लॉकडाऊनच्या भीतीने गावी परतले. मजूरांची संख्या कमी झाल्याने काम मंदावले. जवळपास मार्च ते नोव्हेंबरपर्यंत काम संथ गतीने सुरू होते. त्यामुळे प्रकल्पाची डेडलाइन सहा महिने पुढे गेली.

नोव्हेंबरमध्ये कामाने घेतला होता वेग -

दिवाळीनंतर, कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर मजूर पुन्हा मुंबई-राज्यात परतू लागले. समृद्धी प्रकल्पातील मजुरही परतले. त्यामुळे कामाने वेग घेतला. या पार्श्वभूमीवर 1 मे 2021मध्ये नागपूर ते शिर्डी हा 520 किमीच्या टप्प्याचे काम पूर्ण होईल आणि हा टप्पा 1 मेपासून वाहतूक सेवेत दाखल होईल असे एमएसआरडीसीने जाहीर केले. नागपूर ते इगतपुरी हा 623 किमीचा टप्पा डिसेंबर 2021 आणि संपूर्ण 701 किमीच्या नागपूर ते मुंबई मार्ग 1 मे 2022ला सुरू होईल अशी घोषणाच एमएसआरडीसीने केली. मात्र, आता या सर्व डेडलाइन कोरोना आणि लॉकडाऊनने चुकवल्या आहेत. मागील दीड महिन्यापासून कामाची गती मंदावली आहे. मजूर कमी झाले आहेत. इतर ही अनेक अडचणी येत असल्याने आता काम बऱ्यापैकी ररखडले असून पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होण्यास आणखी किती काळ लागेल हे अजूनही सांगता येत नाही. दुसरी लाट ओसरत नाही तोपर्यंत काम वेग घेणार नाही. त्यामुळे हा मोठा फटका या प्रकल्पासाठी ठरत असल्याची माहिती एमएसआरडीसीतील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे. तेव्हा समृद्धी महामार्गावरून प्रवास करण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मेट्रो 2 अ आणि 7 ही लटकली -

मुंबईत सर्वच पायाभूत सुविधा प्रकल्पाना कोरोना-लॉकडाऊनचा फटका बसत आहे. त्यातही मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि प्रतीक्षेचा मेट्रो 2 अ (दहिसर ते डीएन नगर) आणि 7 (दहिसर पूर्व ते अंधेरी) प्रकल्पालाही याचा मोठा फटका बसला आहे. मार्चमध्ये या दोन्ही मार्गावर स्वदेशी बनावटीच्या मेट्रो गाडीची ट्रायल रन घेण्यात येणार होती. तर 1मे ला या दोन्ही मार्गाचा शुभारंभ करत हे प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत दाखल केले जाणार होते. मात्र, फेब्रुवारीपासून कोरोना वाढण्यास सुरुवात झाली आणि मार्चमध्ये कोरोनाने हाहाकार उडवला. त्यात आता लॉकडाऊन करण्यात आला आहे. एकूणच कोरोनाची भीती आणि लॉकडाऊनमुळे या प्रकल्पात काम करणारे मजूर कमी होऊ लागले आहेत. त्याचा कामावर परिणाम झाला आहे, अशी माहिती बी. जी. पवार, सह महानगर आयुक्त, एमएमआरडीए यांनी दिली आहे. नक्की किती मजूर कमी झाले हे आताच संगता येणार नाही. आता पुढे काम कधी पूर्ण होणार हे सांगणे ही अवघड असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे. तेव्हा मेट्रोतुन प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न आणखी किती महिने लांबणार हा प्रश्नच आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.