ETV Bharat / city

Sameer Wankhede Caste Certificate : समीर वानखेडे यांनी मागितला वेळ.. जात पडताळणी समितीला द्यावी लागणार कागदपत्रं.. - Fake Drugs Case By Wankhede

मुंबई एनसीबीचे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे यांनी जातपडताळणी समितीला कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितली आहे. आज त्याबाबत जातपडताळणी समितीसमोर सुनावणी झाली. वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करण्यात आला ( Sameer Wankhede Fake Caste Certificate ) आहे.

समीर वानखेडे
समीर वानखेडे
author img

By

Published : Dec 28, 2021, 8:45 PM IST

मुंबई- मुंबई एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे ( NCB Officer Sameer Wankhede ) यांनी आज जातपडताळणी समितीसमोर ( Caste Verification Committee ) वकिलांच्या मार्फत कागदपत्र सादर करण्याकरिता वेळ मागितली आहे. त्यामुळे आता 18 जानेवारी रोजी जात पडताळणी समिती समोर समीर वानखडे कागदपत्र सादर करणार आहेत.

कागदपत्र सादर करावे लागणार

समीर वानखेडे यांचे जातप्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करण्यात आला ( Sameer Wankhede Fake Caste Certificate ) होता. या प्रकरणी जातपडताळणी समितीसमोर समीर वानखेडे यांचे वकील हजर झाले होते. त्यांनी समितीसमोर काही वेळ मागितला होता. त्यानुसार समितीने 18 जानेवारी रोजी पुढील सुनावणी ठेवली असून, तोपर्यंत समितीसमोर कागदपत्र सादर करण्याचे सांगितले आहे.

सामाजिक कार्यकर्त्याची आहे तक्रार

अशोक कांबळे या सामजिक कार्यकर्त्याने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याची तक्रार केली आहे. त्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या तक्रारीनुसार महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत ( Social Justice Special Assistance Department ) असलेल्या जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने तक्रारदाराला पुरावे घेऊन माटुंगा रोड कार्यलयात मंगळवार दि 30 नोव्हेंबर रोजी बोलावले होते. तक्रारदार अशोक कांबळे यांचे वकील नितीन सातपुते यांनी कार्यालयात सर्व कागदपत्र सादर केले आहे. त्यानंतर आयोगाने समीर वानखडे यांना समन्स पाठवला होता. मात्र, पहिल्या समन्सला समीर वानखडे गैरहजर राहिले होते. त्यानंतर आज समीर वानखेडे यांनी त्यांचे वकील समितीसमोर काही वेळ मागण्याकरिता पाठवले होते. त्यानुसार समितीने वेळ दिला आहे. आता या पुणे 18 जानेवारी रोजी होणार आहे.

समीर वानखेडेंवर नवाब मलिकांचा आरोप

दरम्यान, गेल्या काही दिवसांत मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यात आरोप- प्रत्यारोप ( Sameer Wankhede Vs Nawab Malik ) होताना दिसून आले. समीर वानखेडे हे भ्रष्टाचारी आणि खंडणीखोर अधिकारी असून, त्यांनी अनेक निर्दोष लोकांना खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवल्याचा नवाब मलिक ( Fake Drugs Case By Wankhede ) यांचा दावा आहे. तसेच, समीर वानखेडे हे जन्माने मुस्लीम ( Sameer Wankhede Muslim By Birth ) आहेत आणि त्यांनी बोगस जात प्रमाणपत्र सादर करून मागासवर्गीयांच्या आरक्षणात घुसखोरी केली व सरकारी नोकरी मिळवली, असाही दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.