ETV Bharat / city

समीर वानखेडेंनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली; नवाब मलिकांचा पुनरुच्चार

नवाब मलिक यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर निशाना साधला आहे. दरम्यान, त्यांनी बोलताना नीरज गुंडे या वक्तीचे नाव घेत हा व्यक्ती मागच्या सरकारचा दलाल असल्याचे म्हटले आहे.

nawab malik
nawab malik
author img

By

Published : Oct 31, 2021, 12:29 PM IST

Updated : Oct 31, 2021, 2:10 PM IST

मुंबई - समीर वानखेडे यांच्या धर्मांतराच्या वादावर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने क्लिनचीट दिली. मात्र, हा प्रकार संशयास्पद असून वानखेडे जन्मापासूनच मुस्लिम असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी चढवला. तसेच ही धर्म आणि जाती वादाची नव्हे तर फर्जीवाड्याविरोधातील लढाई असल्याचे ते म्हणाले.

प्रतिक्रिया

'संविधानिक पदाचा मान राखा' -

धर्मांतरावरून होत असलेल्या आरोपांमुळे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली. जातीसंबंधी कागदपत्रे आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांना दिल्यानंतर संबंधितांचे जातीसंबंधीची कागदपत्र तपासून धर्मांतर केल्याचे दिसून नसल्याचे सांगत क्लिनचीट दिली. तसेच वैयक्तिक आरोप करणे योग्य नसल्याचे मत मांडले. मलिक यावरुन आयोगाला लक्ष केले. समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम असून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्षांनी दिलेली क्लीनचीट संशयास्पद असल्याचे म्हटले. तसेच हलदर तुम्ही संविधानिक पदावर आहात त्याचा मान राखा, असे सांगतानाच आयोगाची एक कार्यप्रणाली आहे एखाद्याने तक्रार केली, तर त्याची चौकशी केली पाहिजे व त्याची प्रक्रिया करुन तसा रिपोर्ट संसदेत ठेवून यावर शिफारस मागितली पाहिजे. परंतु तुम्ही माध्यमातून कसे काय सांगू शकता अशी विचारणाही मलिक यांनी केली.

'फर्जीवाड्या विरोधातील ही लढाई' -

समीर वानखेडे जन्मापासूनच मुसलमान आहे. त्याच्या वडिलांनी धर्म बदलला होता. दोन्ही मुलं लहानपणापासून मुसलमान आहेत. मुसलमान पध्दतीने जगले आहेत. समीर वानखेडे याच्या लग्नाचा विषय मी समोर आणला. शनिवारी एका व्यक्तीचा फोटो ट्वीट केला. तो समीर वानखेडे याच्या बहिणीचा नवरा आहे. आज तो युरोपच्या वॅनिसमध्ये राहतो. मुळचा तो सुरतचा राहणारा आहे. हा विषय आम्ही समोर आणला आहे. जिचा नवरा आहे तिने ट्वीट करुन हा फोटो का आणला, अशी विचारणा केली. मी हा फोटो समोर आणला नाही. जर तुमच्याकडे आयोग चौकशी करेल त्यावेळी आम्हाला मिळालेल्या अधिकारानुसार आम्ही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे व जात पडताळणी समितीकडेही तक्रार करणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. मी धर्म आणि जातीची लढाई लढत नाहीय त्याने फर्जीवाडा केला. दलित तरुणांचा अधिकार हिरावून घेतला त्याविरोधात लढाई आहे असे सांगतानाच हलदर तुम्ही कधी पदावर आलात हे माहीत नाही; परंतु ज्या पदावर बसला आहात, त्या पदाची गरीमा बदनाम करु नका, अशी जोरदार टीकाही नवाब मलिक यांनी केली.

हेह वाचा - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह हे बेल्जियमध्ये; संजय निरूपम यांचा दावा

Last Updated : Oct 31, 2021, 2:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.