मुंबई - एनसीबी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी आरोप केल्यानंतर समीर वानखेडे यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे यांनी जात पडताळणी विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर आज या तक्रारीची चौकशी सुरू झाली आहे.
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून आज समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रा विरोधात आलेल्या तक्रारीची चौकशी आज केली जात आहे. अशोक कांबळे या सामजिक कार्यकर्त्यांनी एनसीपीच्या अधिकारी समीर वानखेडे यांचा जात प्रमाणपत्र खोटे असल्याची तक्रार केली आहे व त्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.