ETV Bharat / city

Sambhaji Raje Reject Shivsena Offer : शिवसेनेची ऑफर संभाजीराजेंनी नाकारली, राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढण्यावर ठाम - संभाजी राजे शिवसेना ऑफर नाकारली

राज्यसभेच्या जागेसाठी सहाव्या जागेसाठी शिवसेनेने दावा ठोकल्यानंतर संभाजी राजे ( Sambhaji Raje ) रिंगणात उतरले आहेत. संभाजीराजांनी शिवसेनेच्या चिन्हावर राज्यसभेत ( Rajyasabha Election ) जावे, अटकळ बांधण्यात आली. मात्र संभाजीराजे यांनी शिवसेनेची ऑफर ( Sambhaji Raje Reject Shivsena Offer ) धुडकावून लावत अपक्ष निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत.

Sambhaji Raje Reject Shivsena Offer
Sambhaji Raje Reject Shivsena Offer
author img

By

Published : May 19, 2022, 9:06 PM IST

मुंबई - राज्यसभेच्या जागेसाठी सहाव्या जागेसाठी शिवसेनेने दावा ठोकल्यानंतर संभाजी राजे ( Sambhaji Raje ) रिंगणात उतरले आहेत. संभाजीराजांनी शिवसेनेच्या चिन्हावर राज्यसभेत ( Rajyasabha Election ) जावे, अटकळ बांधण्यात आली. मात्र संभाजीराजे यांनी शिवसेनेची ऑफर ( Sambhaji Raje Reject Shivsena Offer ) धुडकावून लावत अपक्ष निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्यामुळे या निवडीसाठी आता चुरस निर्माण झाली आहे.

राज्य सभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस - माजी खासदार संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचा निर्णय अगोदरच जाहीर केला. त्यानंतर शिवसेनेचा एकच खासदार निवडून जाणार असताना आणि शिल्लक राहिलेल्या मतांच्या जोरावर आणखी एक उमेदवार उभा कऱण्याची घोषणा केली. तर दुसऱ्याबाजूला संभाजी राजे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली. यापार्श्वभूमीवर संभाजी राजे यांना राज्यसभेची निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी शिवसेनेत यावे आणि त्यानंतर शिवसेना विचार करेल, असे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्ट केले. संभाजीराजेंनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संध्याकाळी भेट घेतली. दरम्यान, शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव संभाजी राजे यांच्या पुढे मांडण्यात आला. मात्र, संभाजीराजेंनी कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक न लढवता, अपक्ष उमेदवार राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेची ऑफर नाकारली - संभाजीराजे यांनी यापुढे माझा कोणत्याही पक्षाशी संबंध असणार नाही. तसेच राज्यसभेची सहावी जागा अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी कॉग्रेसने पाठींबा देण्याचे सुतोवाच केले. त्यामुळे मित्र पक्षांना विश्वासात न घेता पाठींबा दिल्याचे सांगत काँग्रेस आणि शिवसेनेने नाराजी व्यक्त केली. तर शिवसेनेने सहावी जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सहाव्या जागेसाठी शिवसेना कोणाला तिकिट देणार हा औस्तूकतेचा विषय बनला असतानाच संभाजी राजे यांनी शिवसेनेची ऑफर नाकरल्याने निवडणुकीत मतांची पळवा पळवी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संभाजी राजे यांना भाजपाने पडद्यामागून एकट्याने मैदानात उतरवल्याची चर्चा आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून संभाजी राजांबद्दल एक सहानूभूतीची भावना मराठा समाजात निर्माण झाली आहे. तसेच महाविकास आघाडीकडे विशेषतः शिवसेनेकडे शिल्लक राहणारी मतांची संख्याही जास्त आहे. जर संभाजी राजे हे राज्यसभेच्या निवडणूकीत पराभूत झाले, तर त्याचे खापर आपसूकच शिवसेनेवर आणि महाविकास आघाडी सरकारवर फोडले जाणार असल्याचे बोलले जाते.

हेही वाचा -Ketki Chitale Custody : केतकी चितळेवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, रबाळे पोलिसांनी घेतला ताबा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.