मुंबई - संपूर्ण देशाचे शक्तिपीठ असलेल्या दुर्गराज रायगड या छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद ६ डिसेंबरला भेट देणार आहेत. याबाबतची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिली.
हेही वाचा - ...अखेर रस्त्यावर धावली लालपरी, रायगड जिल्ह्यातील आठ आगारात बससेवा सुरू
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या ६ डिसेंबरला भेट देणार आहेत. स्वतंत्र भारताच्या इतिहासात राष्ट्रपती आणि पंतप्रधान या दोन्ही पदांवरील मान्यवरांनी भेट दिलेला रायगड हा एकमेव किल्ला आहे. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९८० रोजी शिवाजी महाराजांच्या 300 व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडाला भेट दिली होती. तर, माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांनी १९८५ ला मेघडंबरीचे अनावरण करण्यासाठी रायगडावर भेट दिली होती. शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले दोन रुपये किमतीचे नाणे सरकारच्या वतीने काढण्यात आले होते. त्याचे अनावरण करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९९ मध्ये रायगडाला भेट दिली होती.
राष्ट्रपतींच्या रायगडावरील भेटीची तयारी पूर्ण
खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली रायगड विकास प्राधिकरणाच्यावतीने गेल्या चार वर्षांपासून गडावर संवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या गड संवर्धनाच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती कोविंद रायगडावर येत आहेत. सहा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता ते लष्करी हेलिकॉप्टरने रायगडावर उतरणार आहेत. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी यावेळी दिली.
रोप वे सर्वांसाठी असावा
रायगडावर असलेला रोप वे हा सर्वांसाठी असावा. केवळ श्रिमंतांना त्यातून जाता येईल, असे न राहता तो गरीब शिवभक्तांसाठीही असावा, अशी आपली इच्छा आहे. तसा प्रस्ताव आपण सरकारला दिलेला आहे. सरकारला शक्य नसेल तर, आपण त्यासाठी प्रयत्न करू, असेही संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - उरणच्या हर्षितीचा साहसी विक्रम; सर्वात कठीण मानला जाणारा वजीर सुळका केला सर