ETV Bharat / city

'सरकारने असा नियम करावा, ज्यामुळे बकरी ईदला लोकांना बकरा मिळेल'

राज्यात बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात काल (मंगळवार) मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात मुस्लिम लोक प्रतिनिधी आणि मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ईद साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन केले होते.

Abu Azmi
अबू आझमी
author img

By

Published : Jul 15, 2020, 8:15 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाचे संकट लक्षात घेता बकरी ईद साजरी करताना आम्ही त्यासाठीची पुरेपूर काळजी घेऊ. परंतु इतर धार्मिक उत्सवाला ज्याप्रमाणे काही नियम लावून परवानगी दिली जात आहे. त्याच धर्तीवर बकरी ईद साजरी करण्यासाठी सरकारने काही नियमावली जाहीर करावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी केली आहे.

राज्यात बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात काल (मंगळवार) मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात मुस्लिम लोक प्रतिनिधी आणि मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ईद साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन केले होते. तर त्याच दरम्यान, मुस्लीम आमदारांनी या बैठकीत राज्यातील परिस्थिती मांडत बकरी ईदच्या कुर्बानीसाठी सवलत द्यावी आणि त्यासाठी काही नियमावली जाहीर केली जावी, अशी मागणी केली होती. मात्र, त्यावर काल निर्णय होऊ शकला नसल्याने मुस्लिम लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी पसरली असून त्यासाठी सरकारने कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन यावर निर्णय जाहीर करावा, अशी मागणी आमदार अबू आझमी यांनी केली.

समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा - विशेष! कोरोना काळात कुली वर्ग करतोय जगण्यासाठी संघर्ष

आझमी म्हणाले की, आम्हाला सरकारच्या नियमांचे पालन करायचे आहे, कोरोनासाठी काळजी घ्यायची आहे. परंतु काही ठिकाणी देशात सरकार पाडण्यासाठी लोक एकत्र येतात, तेथे नियमांचे पालन होत नाही, लग्न कार्ये होताहेत, मंदिरांमध्ये पुजा होत आहे, लोक जात आहेत, सोशल डिटन्सचे पालन होत नाही, पण आम्ही सरकारच्या नियमांचे पालन करू. मात्र, बकरी ईदला आम्हाला बकरे उपलब्ध व्हावेत, इतकीच आमची रास्त मागणी आहे. यासाठी मुंबईत २४ वार्ड आहेत, त्या ठिकाणी बकरे उपलब्ध होतील, अशी व्यवस्था करावी.

तसेच गणेशोत्सवाप्रमाणे आम्हालाही कुर्बानीसाठी ऑनलाईन परवानगी देण्यात यावी. त्यासाठी आठ दिवसांचा वेळ देऊन त्यांना बकरे उपलब्ध करून द्यावीत त्यांना ठराविक जागा ठरवून देवून त्यांना सक्तीने नियमांचे पालन करण्याचे आदेश द्यावेत. मोठ्या बाजारांसाठी अडचणी असल्या तरी छोटे बाजार लागतील, असे आम्हाला मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले होते. परंतु, कालच्या बैठकीत वेगळाच विषय आल्याने आम्ही नाराज झालो होतो. राज्यातील जनता आम्हाला विचारत आहे. त्यामुळे गणपती उत्सवाच्या धर्तीवर आम्हालाही काही नियमावली जारी कराव्यात, अशी आमची मागणी असल्याचेही अबू आझमी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.