मुंबई - बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानला ( Salman Khan Get Relief From Mumbai Highcourt ) मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पत्रकार अशोक पांडेला 2019च्या मारहाण ( Journalist Ashok Pandey beaten Up Case ) प्रकरणी बांद्रा कोर्टाने सलमान खान विरोधात जारी केलेल्या समन्सला मुंबई उच्च न्यायालयाने 13 जून 2022 पर्यंत स्थगिती दिली आहे. अभिनेता सलमान खान विरोधात बांद्रा ( Bandra Court ) कोर्टाने समन्स जारी केल्यानंतर सलमान खान मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. या प्रकरणात आज सुनावणी करण्यात आली. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने सलमान खान याला मोठा दिलासा दिला आहे.
सलमानला दिलासा - दिवाणी न्यायालयाने मार्च महिन्यात सलमान आणि त्याचा अंगरक्षक नवाज शेख यांना समन्स बजावले होते आणि त्यांना 5 एप्रिल रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने 5 मे पर्यंत समन्सला स्थगिती दिली होती. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत 13 जून 2022 पर्यंत स्थगिती वाढवण्यात आली. दंडाधिकारी न्यायालयाने त्याला 9 मेपर्यंत वैयक्तिक हजर राहण्यापासून सूट दिली होती.
काय आहे प्रकरण? - अंधेरीच्या डी एन नगर परिसरात सलमान खान सायकल चालवत असताना अशोक पांड्ये यांनी त्याचा जवळपास 15 ते 20 मिनिटे पाठलाग करत व्हिडिओ बनवला. यावेळी सलमानसोबत झालेल्या वादामुळे अशोक पांडे यांनी तक्रार दाखल करून सलमान व त्याच्या बॉडीगार्डविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. व्हिडिओ बनवत असल्याने त्याचा सलमानला राग आल्यामुळे सलमान आणि त्याच्या अंगरक्षकाने त्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावून घेतला. तसेच शिवीगाळ केली, असा आरोप देखील करण्यात आला होता.
हेही वाचा- हरियाणातून दहशतवादी शस्त्रसाठ्यासह ताब्यात, नांदेडमधील धुमाकुळीचा उधळला डाव