ETV Bharat / city

साकीनाका पोलिसांनी 170 मोबाईल केले परत - etv bharat news

अनेकदा हरवलेला मोबाईल मिळण्याची शक्यता कमी असते. साकीनाका पोलिसांनी हरवलेले 170 मोबाईल परत दिले आहेत. 600 पैकी 170 मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

Sakinaka police
Sakinaka police
author img

By

Published : Oct 17, 2021, 5:34 PM IST

मुंबई - मोबाईल हा मानवाचा अभिवाज्य भाग बनला आहे. अनेकदा मोबाईल हरवल्यानंतर तो परत मिळण्याची शक्यता कमी असते. ही शक्यता साकीनाका पोलिसांनी खोडून काढली आहे. तब्बल 170 हरवलेले मोबाईल साकीनाका पोलिसांनी परत केले आहे.

साकीनाका पोलिसांनी 170 मोबाईल केले परत
चोरीला तसेच हरवलेले मोबाईल शोधणे हे देखील पोलिसांच्या समोर एक मोठे आवाहन असते. गेल्या दोन वर्षात साकीनाका पोलिसांनी १७० मोबाईल शोधून काढले आहे. परिमंडळ दहाचे उपायुक्त डॉ. महेश्वरी रेड्डी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख आणि याचे तपास अधिकारी हनुमंत धवन यांच्या हस्ते मालकांना परत देण्यात आले. यावेळेस नागरिकांना सायबर गुन्हेगारी, मोबाईल चोरीपासून कसे वाचावे आणि मोबाईल आणि डेटा सुरक्षित कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. नागरिकांनी मोबाईल परत मिळाल्याने पोलिसांचे आभार मानले.

वर्षभरात 600 मोबाईल हरवल्याच्या तक्रारी
ज्याप्रकारे मोबाईल चोरी होतात त्याच्यावरही आमचे काम सुरू आहे. आम्ही जे मोबाईल हरवल्याचा तक्रारी दाखल करतो. त्यावरही काम सुरू आहे. साकीनाका पोलिस ठाण्यात वर्षभरात 600 मोबाईल हरवलेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी 170 मोबाईल आम्ही परत केले आहे. 'अनेक महत्वाच्या गोष्टी मोबाईलमध्ये असतात. यामुळे आम्ही मोबाईल शोधण्यासाठी प्राधान्य दिले. नागरिकांनी महत्वाची माहिती मोबाईलमध्ये ठेवू नये. त्याचा दुरुपयोग होऊ शकतो' असे परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्तचे डॉ. महेश्वरी रेड्डी यांनी सांगितले.

हेही वाचा - आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ: रोहित पवार 'न्यासा'वर संतापले, ट्वीटमध्ये म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.