मुंबई - श्री संत नरहरी सोनार ( Saint Narhari sonar ) यांचा जन्म देवगिरी येथे झाला. 'सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई', 'शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा', 'माझे प्रेम तुझे पायी' आणि 'देवा तुझा मी सोनार' इत्यादी त्यांनी रचलेले अभंग प्रसिद्ध आहेत. संत नरहरी सोनार यांनी रचलेले फार थोडे अभंग उपलब्ध आहेत. वारकरी संप्रदायातील संत नरहरी सोनार हे प्रथम शैवपंथी ( Saint Narhari sonar first shaivapathi warkari ) होते. चांगदेव महाराज यांनी त्यांचे नाव नरहरी असे ठेवले होते. वयाचा अठरा वर्षी त्यांचा गंगाबाईशी विवाह झाला होता. नरहरी महाराज एकनिष्ठ शिवभक्त होते ( Lord Shiva Devotee ). आज श्री संत नरहरी सोनार यांची जयंती आहे ( Saint Narhari sonar Jayanti ) . पंढरपुरात राहुन पांडुरंगाचे दर्शन तर सोडाच पण मंदिराचा कळसाकडे देखील पाहात नव्हते. एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा साक्षात्कार त्यांना झाल्याच प्रचलित आहे. तेव्हापासून त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करुन घेतला. रामचंद्रदास कृष्णदास हरिप्रसाद मुकुंदराज मुरारी अच्यूत आणि नरहरी अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते. त्यांनी २ फेब्रुवारी १३१४ साली समाधी घेतली.
स्वत: देव दागिने घडवू लागले - या अद्वैतच अभेद्य सिद्धांताची प्रचिती नरहरींना झाली. तेव्हापासून नरहरी सारखे विठ्ठलाच्या सान्नीध्यात मंदिरात बसून भजन किर्तन करु लागले. त्यांची हि अस्सीम सेवा भक्ती पाहुन भगवान प्रसन्न झाले. त्यांचा अंतकरणामध्ये भगवान वास करु लागलेत. नरहरीच्या दुकानामध्ये स्वत: भगवान येऊन दागिने घडवू लागले होते.नंतर नरहरी महाराजांना संसारासंबंधी पुर्णपणे अनासक्ती आली होती. ते ब्रम्हस्थितीला प्राप्त झाले होते. आपल्या गावातरी न्या हो दयाला मला भेट द्या हो. तेव्हा देवालाही भक्ताची चिंता लागली व दया आली. अशा प्रकारे माघ वद त्रुतियेला नरहरींनी आपल्या मल्लिकार्जुन देवाला नमन केले आणि पत्नी, मुलगा, सुनांचा, नातवंडांचा अंतिम निरोप घेतला.
संत नरहरी सोनार यांची शिव-भक्ती - विविध अठरापगड जाती जमातीच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. यात पंढरपूरमधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला होता. संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय दागिने बनवण्याचा होता. त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगली प्रसिद्ध होती. त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर पंढरपुरात व्यवसायाचा चांगला जम बसविला होता. संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिवभक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती. त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. रोज सकाळी उठल्यावर ते शिव-आराधना करीत असे. रोज पहाटे जोतिर्लिंगावर ते बेलपत्र वाहत असायचे. ते कट्टर शिवभक्त असल्याने दुसऱ्या देवावर त्यांची फारशी श्रद्धा नव्हती, यामुळे काही जणांना त्यांच्या या वागणूकीचा राग येत होता.
पुण्यतिथी - परळी वैजनाथ येथे आणि अन्य ठिकाणी माघ कृष्ण तृतीयेला श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी महोत्सव राज्यभर साजरा केला जातो.
हेही वाचा - Seed Rakhi : पद्मश्री राहीबाईंची 'बीज राखी'; भाजप नेते चंद्रकांत पाटलांंसाठी बनवली खास राखी