ETV Bharat / city

Sachin Waze re-examination : वाझे यांची अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून आज पुन्हा उलट तपासणी

चांदीवाल आयोगासमोर (Chandiwal commission) आज पुन्हा सचिन वाझे (Sachin Waze) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे दोघेही आमनेसामने आले होते. आज देशमुख यांच्या वकिलांनी वाझे यांची उलट तपासणी (Sachin Waze re-examination) केली आहे.

sachin waze and anil deshmukh
सचिन वाझे आणि अनिल देशमुख
author img

By

Published : Dec 1, 2021, 4:24 PM IST

Updated : Dec 1, 2021, 4:38 PM IST

मुंबई - 100 कोटी कथित वसुली (100 Crore Extortion Case) प्रकरणी चांदीवाल आयोगासमोर (Chandiwal commission) आज पुन्हा सचिन वाझे (Sachin Waze) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे दोघेही आमनेसामने आले होते. सचिन वाझे यांची उलट तपासणी करण्यासाठी अनिल देशमुख यांच्या वकिलांना आयोगाकडून आज परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार अनिल देशमुख यांच्या वकिलांनी सचिन वाझे यांची उलट तपासणी (Sachin Waze re-examination) केली आहे.

चांदीवाल आयोगाचे वकील

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप लावल्यानंतर गठीत करण्यात आलेल्या समितीसमोर आज अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून सचिन वाझे यांची उलट तपासणी करण्यात आली. चांदीवाल आयोगाच्या वकिलांना भेटण्यासाठी सचिन वाझे यांना 8 डिसेंबर ही तारीख देण्यात आली आहे. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 9 डिसेंबर रोजी आयोगाच्या वकिलांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.

अनिल देशमुख यांचे वकील अनिता कँस्टेलिनो यांनी सचिन वाझेंची केली उलट तपासणी

Q- संपूर्ण महाराष्ट्रात किती सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत अंदाजे

A- महाराष्ट्रात अंदाजे पाच हजार असतील

Q- यातील मुंबई पोलीस दलात किती कार्यरत आहेत

A- मुंबईत अंदाजे 2 हजार 500 कार्यरत असतील

Q- गृहमंत्र्यांना कुठल्या गुन्ह्याची माहिती कोण देतात

A- संबंधित अधिकारी वरिष्ठांच्या परवानगीने देतात

Q- पाच ते सहाजण जाऊन माहिती देतात

A- हे सर्व गृहमंत्री यांच्या आदेशावर अवलंबून असते

Q- अनिल देशमुख यांना तुम्ही फक्त शासकीय कामासाठी भेटत होतात

A- शासकीय कामासंदर्भात भेटत होतो

Q- तुम्ही शासकीय कामाव्यतिरिक्तही भेटत होतात

A- मला आठवत नाही

Q- तुम्ही कुंदन शिंदेला ओळखता का

A- मी त्यांना वैयक्तिक ओळखत नाही. मात्र, ते गृहमंत्री यांचे स्वीय सहाय्यक असल्याचे माहिती होती

Q- तुमचं कधी त्यांच्याशी बोलणं झालं का?

A- आठवत नाही

Q- मंत्रालयात पोलिसांना जाण्यासाठी काय प्रक्रिया आहे?

A- मंत्रालयात जाण्यासाठी पोलिसांना परवानगी घ्यावी लागते, संबंधित व्यक्तीला भेटणार त्याची

Q- पोलिसांना मंत्रालयात जाण्यापूर्वी एन्ट्री करावी लागते का?

A- संबंधित व्यक्ती ज्याला भेटणार आहे ती गेटवर मेसेज देतात त्यानुसार Entry करून सोडतात. मात्र, मला त्याबद्दल अधिक माहिती नाही.

Last Updated : Dec 1, 2021, 4:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.