ETV Bharat / city

Sachin Waze cross examination - सचिन वाझेची अनिल देशमुखांच्या वकिलाकडून आज पुन्हा उलट तपासणी

100 कोटी कथित वसुली प्रकरणाचा आरोप लावल्यानंतर राज्य सरकारकडून चौकशी करण्याकरिता गठीत करण्यात आलेल्या चांदीवाल आयोगासमोर आज पुन्हा सचिन वाझे, अनिल देशमुख हे दोघेही आमनेसामने आले होते. आज ( 13 डिसेंबर ) अनिल देशमुख यांच्या वकिलाने पुन्हा सचिन वाझे याची उलट तपासणी केली.

author img

By

Published : Dec 13, 2021, 3:23 PM IST

Sachin Waze cross examination etvbharat
सचिन वाझे उलट तपासणी अनिल देशमुख वकील

मुंबई - 100 कोटी कथित वसुली प्रकरणाचा आरोप लावल्यानंतर राज्य सरकारकडून चौकशी करण्याकरिता गठीत करण्यात आलेल्या चांदीवाल आयोगासमोर आज पुन्हा सचिन वाझे, अनिल देशमुख हे दोघेही आमनेसामने आले होते. आज ( 13 डिसेंबर ) अनिल देशमुख यांच्या वकिलाने पुन्हा सचिन वाझे याची उलट तपासणी केली. 1 डिसेंबरला देखील आयोगासमोर सचिन वाझेची उलट तपासणी करण्यात आली होती.

हेही वाचा - Mumbai High Court relief to actress Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

आयोगाचे आजचे कामकाज 14 डिसेंबर पर्यंत दुपारी 11.00 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

अनिल देशमुख यांचे वकील अनिता कँस्टेलिनो यांनी सचिन वाजेंना विचारलेली प्रश्ने

Q निलंबनातून परत एकदा सेवेत घेताना मागील रेकॉर्ड तपासणे शासकीय प्रक्रिया असते ?
A हो

Q तुम्हाला सेवेत परत घेताना तुमच्या मेरिटवर घेतले गेले का?
A हो. माझा मागील परफॉर्मन्स पाहता मला परत सेवेत घेतले गेले.

Q निलंबनाच्या कालावधीत तुम्ही कधी मुंबई पोलिसांशी, आयुक्त कार्यालयाशी संपर्कात होते का?
A हो. मी गरजेनुसार पोलिसांना गुन्ह्याच्या तपासात मदत करत असे.

Q वरिष्ठांच्या परवानगीशिवाय मुंबईच्या बाहेर आपण तपास कार्यासाठी गेले होते का?
A नाही.

Q सेवेत रुजू झाल्यानंतर जर गरज असल्यास इतर पोलीस तपास करत असलेल्या प्रकरणात आपली मदत लागल्यास ते घेत होते का? अर्णव गोस्वामी केस संदर्भात २ घटना
रायगड पोलीस आणि TRP केस?

A TRP केस detection क्राईम ब्रांचची होती. मी त्या केसचा इन्चार्ज होतो. रायगड पोलिसांनी मदत मागितली त्यासाठी अर्णव गोस्वामी केसमध्ये पोलीस सहआयुक्त (jt CP) मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार मी टीमचे नेतृत्व करत होतो. रायगडहून आलेल्या पोलीस पथकाला सहकार्य करत होतो. मला आता आठवत नाही, रायगडवरून किती पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी आले होते. आम्ही सकाळी ६ वाजता अर्णव गोस्वामीच्या घरी पोहोचलो.

Q पोलिसांनी केलेल्या कारवाईची प्रेस रिलिज काढली जाते का?
A हो.

Q अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर

गोस्वामी यांच्या अटकेनंतर त्या संदर्भात मी माहिती माझा वरिष्ठांना दिली. शशांक शांढोर एसीपी यांना मी रिपोर्ट करायचो. मी पोलीस सहआयुक्तांना (jt CP) रिपोर्ट करायचो.

Q आयुक्त वगळता तुम्ही एसीपी, डीसीपी आणि पोलीस सहआयुक्तांना रिपोर्ट करायचे, असे म्हणायचे का?

A मला आठवत नाही मी आयुक्तांना रिपोर्ट केले.

Q अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर चुकीच्या पद्धतीने अटक केली या संदर्भात विवाद झाला का?
A आठवत नाही

Q TRP केसशी संबंधित मुंबई पोलीस आयुक्तांना तुम्ही ब्रीफ केले का?

A नाही. मी ब्रीफ केलं नाही.

Q अर्णव गोस्वामी यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचऱ्यांची चौकशी किंवा तपास टीआरपी केसमध्ये केला का?

A मी अर्णवशी चौकशी केली नाही. त्यांच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली.

Q TRP केसमध्ये बार्ककडून तुम्ही ३० लाख रुपये घेतले, असा आरोप आहे. हे खर आहे का?

A नाही. आठवत नाही.

Q BARC कडून ३० लाख घेतले या आरोपाबद्दल ईडीकडून आपली चौकशी झाली होती का?
A नाही.

Q अर्णव गोस्वामी यांच्या केसबद्दल पोलीस आयुक्तालयात रोज कमिशनर प्रेस ब्रीफ करायचे का?

A नाही.

Q TRP केसमध्ये आरोपी आणि पीडित कोण होते?
A मला आठवत नाही.

Q बार्कने काही विशेष तक्रार केली होती का? ज्यात अर्णव गोस्वामींचे नाव होते.

A नाही

Q TRP केसमध्ये रेटिंगमध्ये छेडछाड केल्याबद्दल अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात तक्रार होती का?

A नाही. आठवत नाही.

हेही वाचा - Anil Deshmukh At Chandiwal Commission : अनिल देशमुख,सचिन वाझे चांदीवाल आयोगा समोर हजर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.