ETV Bharat / city

मनसुख हिरेन हत्या प्रकरण: व्होल्वो कार आणि संशयित आरोपीसह एटीएस पथक मुंबईत

Forensic team enters NIA office
Forensic team enters NIA office
author img

By

Published : Mar 23, 2021, 3:15 PM IST

Updated : Mar 23, 2021, 7:41 PM IST

19:35 March 23

अँटिलिया प्रकरण: स्कॉर्पिओची फॉरेन्सिक तपासणी

अँटिलिया कार स्फोटक प्रकरणात ज्या गाडीचा वापर करण्यात आला. ती कार एनआयए कार्यालयात आणण्यात आली आहे. या स्कॉर्पिओ गाडीची पुण्याच्या टीमकडून तपासणी केली जात आहे.

18:32 March 23

वोल्वो कार आणि संशयित आरोपीसह एटीएस पथक मुंबईत

जयजित सिंह पुढे म्हणाले, विनायक शिंदे हा मुंबई पोलीस दलातील 2007 साली वर्सोवा येथे झालेल्या लखनभैय्या चकमक प्रकरणातील आजीवन कारावासाची शिक्षा झालेला आरोपी आहे. तो सध्या मे 2020 पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पॅरोलवर बाहरे असताना त्याने हा अपराध केला आहे. त्याने मयत मनसुख यांच्याशी संपर्क केला त्यांना बोलावून घेतलं. आणि त्याचा या हत्येत प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे मिळाले आहेत.

अटक झालेल्या आरोपींची कसून चौकशी करण्यात आली असून गुन्हा कसा केला यासंदर्भातील प्रात्यक्षिकही घेण्यात आलेलं आहे. दोन्ही आरोपींमध्ये सिम कार्डची देवाण-घेणाव झाल्याचंही तपासात निष्पन्न झालं आहे. तसेच काही सिम कार्ड आरोपींनी नष्ट केल्याचीही माहिती मिळाली. दोन्ही आरोपींनी दिलेली माहिती यावरुन एक पथक दमणला रवाना झालं आहे होतं. एक वोल्वो कार आणि संशयित आरोपीसह हे पथक मुंबईत पुन्हा आलेलं आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. 
 
18:27 March 23

नरेश कौर आणि विनायक शिंदे यांनाही केली एटीएसनं अटक

एटीएसनं मिळालेल्या माहितीच्या आधारे या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या सिम कार्डचा शोध घेतला. हे सिम कार्ड मुंबईत पत्त्याचे क्लब आणि बेटिंग घेणाऱ्या क्लब चालवणाऱ्या एका इसमाने सचिन वाझे यांच्या सांगण्यावरुन गुजरात येथील त्याच्या ओळखीच्या व्यक्तीकडून मिळवले होते. हे सिम कार्ड एका कंपनीच्या नावाने खरेदी केल्याचं तपासात निष्पन्न झालं. प्राथमिक चौकशीत सिम कार्ड बुकी नरेश रमणिकलाल कौर याने सचिन वाझे यांच्या सांगण्यावरुन आरोपी विनायक शिंदे यांच्याकडे दिल्याचं तपासात निष्पन्न झालं. त्यानंतर नरेश कौर आणि विनायक शिंदे यांनाही एटीएसनं अटक केली, असे एटीएसचे प्रमुख जयजित सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

17:22 March 23

सचिन वाझे यांनीच आपल्या पतिचा खून केला; विमला हिरेन यांचा आरोप

एटीएसचे प्रमुख जयजित सिंह म्हणाले, दिनांक 6 मार्च 2021 रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणासंदर्भातील तक्रार दाखल करण्यात आली होती. हा तपास दहशतवादी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला होता. 7 मार्च रोजी एटीएसने याप्रकरणाची सर्व कागदपत्र प्राप्त करुन त्याच दिवशी मनसुख हिरेन यांची पत्नी आणि विमला हिरेन यांचा जबाब नोंदवला. त्यावेळी विमला हिरेन यांनी आपल्या जबाबत सचिन वाझे यांनीच आपल्या पतिचा खून केल्या आरोप केला होता. विमला हिरेन यांच्या जबाबावरुन एटीएसनं याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. सदर गुन्ह्यातील घटनास्थळी कोणताही पुरावा सापडलेला नव्हता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या प्रकरणातील संशयित आरोपी सचिन वाझे यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यावेळी सचिन वाझे यांनी त्यांच्याविरोधातील सर्व आरोप फेटाळून लावले होते. अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकं ठेवण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी आपल्या ताब्यात कधीही नसल्याचं सांगितलं. तसेच मृत मनसुख हिरेन यांच्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचं सांगितलं होतं. त्याचसोबत या गुन्ह्यात आपला सहभाग नसून याप्रकरणाबाबत काहीच माहिती नसल्याचंही सांगितलं.

16:41 March 23

एटीएस प्रमुख जयजित सिंग यांची पत्रकार परिषद

एटीएस प्रमुख जयदीप सिंग यांची पत्रकार परीषद

16:28 March 23

अँटिलिया प्रकरण: स्कॉर्पिओ गाडी एनआयए कार्यालयात दाखल

अँटिलिया कार स्फोटक प्रकरणात वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी. एनआयए कार्यालयात आणण्यात आली आहे. याचं गाडीमध्ये स्फोटक सापडली होती. आज पुण्यावरुन सेंट्रल फॉरेन्सिक डिपार्टमेंटची टीम एनआयए कार्यालयात आली आहे. या टीमकडून देखील या गाडीचा तपास केला जाणार आहे. 

16:13 March 23

हिरेन प्रकरणात आरोपींना सीम कार्ड नष्ट केल्याची माहिती एटिएसने दिली आहे.

16:11 March 23

सचिन वाझेंनी दिलेला जबाब खोटा -एटीएस

एटीएसने विमला हिरेनचा जबाब नोंदवला, तसेच घटनास्थळी पुरावा सापडला नाही. सचिन वाझेंनी दिलेला जबाब खोटा असल्याची माहिती एटीएस चीफ  जयदीप सिंग यांनी दिली आहे. 

16:05 March 23

हिरेन यांच्या हत्येत सचिन वाझे यांचा सहभाग - ए़टीएस

15:37 March 23

हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ATS कडे राहणार ?

हिरेन हत्या प्रकरणाचा तपास NIA कडे न देण्याबाबत राज्य सरकारचा निर्णय झाल्याचे समजते. वेळ प्रसंगी न्यायालयात धाव घेण्याची सरकारची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्राने हा तपास NIA ने ताब्यात घेण्याबाबत आदेश दिले होते. ATS ची तपासाची गती पाहता, हा गुन्हा NIAकडे वर्ग केल्यास तपासाला खिळ बसण्याची शक्यता आहे.

15:21 March 23

फॉरेन्सिकची टीम एनआयए कार्यालयात दाखल

फोरेंसिंक टीम एनआयए कार्यालयात दाखल होताना

सेंट्रल फॉरेन्सिक लॅबोरेटरी ची टीम मुंबईच्या एनआयएच्या कार्यालयात दाखल झाली आहे. पुण्याहून मुंबईला पुन्हा एकदा क्राईम सीनसाठी टीम मुंबईत दाखल.

15:20 March 23

एटीएसने जप्त केलेल्या व्होल्वो कारची फोरेंसिक तपासणी सुरू

सूत्रांकडून असे समजते की, सचिन वाझेच्या पार्टनरची ही गाडी असल्याचे बोलले जात आहे. गाडीचा नेमका वापर काय आणि कशासाठी करण्यात आलाय, याचा तपास एटीएस करत आहे. मात्र तपासात व्होल्वो गाडीचा सारखा उल्लेख आल्याने एटीएसने कारवाई केली आहे. मनसुख हिरेन प्रकरणात मुख्य आरोपी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केल्यानंतर ठाणे एटीएसने दोन आरोपींना अटक केली आहे. काल देखील ठाणे एटीएसने अनेक ठिकाणी झडती घेतल्यानंतर आता मोठी कारवाई देखील केली आहे.

15:04 March 23

मनसुख हिरेन हत्या प्रकरण: व्होल्वो कार आणि संशयित आरोपीसह एटीएस पथक मुंबईत

मुंबई - आज पहाटे एटीएस टीमने दमन येथून व्होल्वो कार जप्त केली आहे. या कारचा वापर मनसुख यांच्या हत्येसाठी केला असावा, असा अंदाज एटीएसला आहे आणि म्हणूनच आता एटीएस या कारची फोरेंसिक तपासणी करत आहे. या कारसाठी आज पहाटे दमन येथे एटीएसने छापा टाकला होता. ही व्होल्वो कार (एमएच 05 डीएच 6789) जप्त केली आहे. सेंट्रल फॉरेन्सिक लॅबोरेटरी ची टीम मुंबईच्या एनआयएच्या कार्यालयात दाखल झाली आहे. पुण्याहून मुंबईला पुन्हा एकदा क्राईम सीनसाठी टीम मुंबईत दाखल.

Last Updated : Mar 23, 2021, 7:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.