ETV Bharat / city

राज्यात अनधिकृत मंदिरांची संख्याही लक्षणीय- सचिन सावंत यांचा राज ठाकरेंना टोला - मशिद अजान

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे यांच्या विरोधातील आंदोलन छेडल्यानंतर अनेक मशिदिंमधील सकाळची आजान ( pray in mosque ) बंद झालेली आहे. परंतु त्याचसोबत हिंदू देवस्थानमधील काकड आरती सुद्धा ( worship in temple ) बंद झाली आहे हे पाप कुणाचे असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ( Sachin Sawant slammed Raj Thackeray ) केला आहे.

Sachin Sawant
सचिन सावंत
author img

By

Published : May 5, 2022, 9:57 PM IST

Updated : May 5, 2022, 10:14 PM IST

मुंबई- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगे यांच्याविरोधातील आंदोलनामुळे हिंदू सण आणि मंदिरांवर ही संक्रात आली आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत ( Congress spokesperson Sachin Sawant ) यांनी केला आहे. राज्यातील मशीन अनधिकृत असल्याची ( Raj Thackerays mosque statement ) ओरड करताना ४७ टक्के मंदिरेही अनधिकृत आहेत, याकडे काँग्रेसचे प्रवक्ते सावंत यांनी लक्ष वेधले.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे यांच्या विरोधातील आंदोलन छेडल्यानंतर अनेक मशिदिंमधील सकाळची आजान ( pray in mosque ) बंद झालेली आहे. परंतु त्याचसोबत हिंदू देवस्थानमधील काकड आरती सुद्धा ( worship in temple ) बंद झाली आहे हे पाप कुणाचे असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ( Sachin Sawant slammed Raj Thackeray ) केला आहे. आता मंदिरसोबत, गुरुद्वारा आणि बौद्ध विहारमधील भोंगे काढण्यात येतील. तसेच हिंदु सणांच्या संदर्भातही अनेक बंधने आता येतील. सर्व धर्मीयांच्या उत्सवावर आलेली संक्रात ही राज ठाकरे यांच्यामुळे आली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

राज्यात अनधिकृत मंदिरांची संख्याही लक्षणीय

अनधिकृत मंदिरांची संख्या अधिक- राज्यामध्ये असलेल्या मशिदी अनधिकृत असल्याची ओरड राज ठाकरे यांनी केली आहे. राज्यात जण १५००० मशिदी असतील तर ८० हजांराहून अधिक मंदिरे आहेत. यातील ४७ टक्के मंदिरे ही अनधिकृत आहेत, असा दावा सचिन सावंत यांनी केला आहे. त्यामुळे इतरांकडे बोट दाखवताना आधी संपूर्ण परिस्थितीची माहिती घ्यावी असेही सावंत म्हणाले. राज ठाकरे हा न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देतात. मात्र न्यायालयानेही रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत डेसिबल वर नियंत्रण ठेवावे असे म्हटले आहे.

मंदिरांकडे अधिकृत परवानगी नाही- मुंबईत २४०४ मंदिरे आणि १११४ मशिदी आहेत. यापैकी ९२२ मशीदीकडे अधिकृत परवानगी आहे. तर केवळ वीस मंदिरांकडे अधिकृत परवानगी आहे. ५ मंदिरांचे आणि १५ मशिदींचे अर्ज परवानगीसाठी प्रलंबित आहेत. राज ठाकरे यांचे म्हणणे ऐकल्यास सर्व मशीदींसोबत मुंबईतील २४०० मंदिरांना ही आपले भोंगे काढावे लागणार आहेत असा दावा सावंत यांनी केला.

भोंगे व मंदिरावरून राज्यात तणावाची स्थिती- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे विरोधात पुकारलेल्या आंदोलनानंतर इशारानंतर मुंबई पोलिसांनी मशिदीवरील भोंगे संदर्भात नियमावली आखून दिली होती. याच पार्श्वभूमीवर आज मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मंदिर, चर्च, बुद्ध विहार या धार्मिक स्थळाचे विश्वासू तसेच पदाधिकाऱ्यांची मुंबई पोलीस आयुक्तालयात बैठक बोलविण्यात आली होती. भोंग्याच्या नियमांचे उल्लंघन ज्यांच्याकडून केले जाईल, त्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाईल असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील त्यांनी दिला. भोंग्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईन्स पूर्णपणे पालन करण्याचे काम पोलिसांकडून करण्यात आले ( SC guidelines for loudspeakers ) आहे. तसेच मुंबईत 135 मशिदीवर अनाधिकृत भोंगे ( unauthorized mosque in Mumbai ) असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. यावर बोलताना गृहमंत्री म्हणाले की, अनधिकृत भोंगेबाबत मुंबई पोलीस आयुक्त निर्णय घेणार आहेत.

हेही वाचा-SambhajiRaje Chhatrapati : खासदारकीचा शेवट दिवस संभाजीराजेंनी 'या' ठिकाणी केला व्यतीत; म्हणाले...

हेही वाचा-Raj Thackeray Ayodhya Visit : 'राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही'

हेही वाचा-हरियाणात अटक केलेल्या दहशतवाद्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी; नांदेडमधील घातपाताचा उधळला डाव

etv play button

Last Updated : May 5, 2022, 10:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.