मुंबई - देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंबईत कोरोनाला आळा घालण्यात प्रशासनाला यश आले, याचे कौतुक सर्वोच्च न्यायालयाने केले. पण सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे कौतुक केल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या पोटात दुखू लागले, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
कौतुकामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या पोटात दुखू लागले -
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मुंबईतील मृत्यूदर ही मोठा आहे. मात्र, हा मृत्यूचा आकडा लपवला जात असून राज्यातील जनतेला खरी परिस्थिती कळने गरजेचा आहे. अशा आशयाचे पत्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने मुंबईमध्ये योग्य दक्षता घेतल्या जात असल्यामुळे करण्याचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे सांगून प्रशासनावर कौतुकही केले होते. पण या कौतुकामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या पोटात दुखू लागले असल्याचे सचिन सावंत म्हणाले आहेत. तसेच भाजपशासित राज्यांमध्ये मुख्यमंत्री मृत्यूचा आकडा लपवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मुंबईची वाखाणणी सर्वोच्च न्यायालयाने केली. याचा फडणवीसांना खरं तर आनंद वाटायला हवा होता. पण त्यांची पोटदुखी व्हावीस, ही अपेक्षा नव्हती, असेही सावंत म्हणाले.
मुंबईचा आम्हाला अभिमान आहे -
खोट्या आकडेवारीचा मसीहा असलेल्या भाजपाचे सर्व मुख्यमंत्री आपल्या राज्यांमध्ये आकडे दडवतात व फडणवीस इथे चिंता व्यक्त करतात, हे आश्चर्याचे आहे. दुसरी लाट सुरू झाली तेव्हा १० फेब्रुवारी रोजी मुंबईत ३.१३ लाख रुग्ण व ११४०० मृत्यू होते. आज ६.७१ लाख रुग्ण व १३६८७ मृत्यू आहेत. दुसऱ्या लाटेच्या ३ महिन्यात २२८७ मृत्यू आहेत. हा दर केवळ ०.७% दर आहे. जो जगात कमी आहे. दिल्लीत आठवड्याला ३००० मृत्यू होत आहेत. कोरोना व्यतिरिक्त मृत्यू कोरोना मृत्यूशी जोडले, तरी हा दर ०.८% फारतर होईल. तो ही जगात कमी आहे. मुंबईचा आम्हाला अभिमान आहे. महाविकास आघाडीचे नेते यासाठी मेहनत घेत आहेत. भाजपाने पोटदुखीचा इलाज करावा व भाजपाशासित राज्यांच्या खोट्या आकडेवारीकडे लक्ष द्यावे, असा टोलाही सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
हेही वाचा - उपरती: पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री कुरेशी म्हणाले, कलम ३७० भारताचा अंतर्गत मुद्दा!