ETV Bharat / city

साताऱ्याच्या गादीसाठी दक्षिण मुंबईतून रसद, माथाडी कामगार प्रचाराला

पाटील यांना साथ देण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबईतून हजारो माथाडी कामदार साताऱ्याच्या वाटेवर आहेत. सातारा, सांगली, पुणे, सोलापूर आणि अहमदनगरचे माथाडी कामगार टप्या-टप्याने साताऱ्याला पोहोचत आहेत.

माथाडी कामगार
author img

By

Published : Apr 5, 2019, 1:15 PM IST

मुंबई - देशभरात निवडणुकीचे वारे वाहत असून महाराष्ट्रात ही आता प्रचाराने वेग घेतला आहे. सातारा लोकसभा मतदार संघात दिग्गज खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात माथाडींचे नेते नरेंद्र पाटील शिवसेनेच्या तिकिटावर लढत आहेत. दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार असून हे कामगार पाटलांच्या प्रचारासाठी थेट साताऱ्याला जाणार आहेत. साताऱ्याची गादी पाटलांना मिळवून देणार असा पन त्यांनी केला आहे.

येत्या २३ एप्रिलला सातारा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. या मतदारसंघात उदयनराजे भोसले लोकप्रिय आहेत. दोनदा निवडणूक जिंकल्यानांतर तिसऱ्यांदा ते आपली ताकद आजमावात आहेत. मोदी लाटेत ही त्यांनी आम आदमी पार्टीचे राजेंद्र चौरंगे यांचा ३ लाख ६६ हजार ५९४ मतांनी धुव्वा उडवला होता. एवढे मताधिक्य पार करणे नरेंद्र पाटील पाटील यांच्यासाठी अतिशय अवघड गोष्ट आहे. त्यातच उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांची दिलजमाई करण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना यश आले आहे. त्यामुळे त्यांचे पारडे आताही जडच आहे. पण या स्तिथीतही नरेंद्र पाटील त्यांना टक्कर देणार आहेत.

माथाडी कामगार

दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात बाजारपेठ असल्याने या भागात पश्चिम महाराष्ट्रातले माथाडी कामगार एकोप्याने राहतात. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांना सहकार्य करावे अशी विंनती ते सहकाऱ्यांना करत आहेत. मुंबई आणि नवी मुंबईत मिळून सव्वा लाख कामगार मुंबईत आहेत. या कामगारांची मोठी ताकद आता साताऱ्याच्या गादीसाठी मेहनत घेणार आहे. राज्यात माथाडी कामगार बोर्डाची कार्यालये आहेत. त्याचबरोबर विविध पक्षांच्या नेत्यांची माथाडी कामगार युनियनही आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार आणि जनरल युनियनमध्ये राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आणि नुकतेच भाजपात दाखल झालेले, मात्र शिवसेनेच्या तिकिटावर सातारा मतदार संघात निवडणूक लढवणारे नरेंद्र पाटील ही या संघटनेत आहेत .

एकीकडे शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे यांना मदत करत आहेत. तर याच युनियनमधील नरेंद्र पाटील उदयनराजेंच्या विरोधात लढत देत आहेत . आमच्या संघटनेचे नेते नरेंद्र पाटील असल्याने त्यांचा प्रचार आम्ही करणार असे माथाडी कामगारांनी सांगितले. तर आगामी विधानसभेत कोरेगाव मतदारसंघात शशिकांत पाटील यांना ही सहकार्य करू अशी दुहेरी भूमिका कामगारांनी घेतली असल्याचे स्पष्ट होत आहे.

Intro:सातारच्या गादी साठी दक्षिण मुंबईतून रसद, माथाडी कामगार प्रचाराला

ही विशेष बातमी रिपोर्टर अँप वरून पाठवली आहे.आता या बातमीसाठी माथाडी कामगारांचे bytes आणि विसुअल्स पाठवत आहे.

Body:....

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.