ETV Bharat / city

फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या की या स्मृतींना कायमची तिलांजली द्यायची- शिवसेना - भारताची फाळणी

नेहरूंच्या कन्या इंदिरा यांनी पंतप्रधान या नात्याने जेव्हा 3 डिसेंबर 1971 रोजी मध्यरात्रीनंतर पाकिस्तानी आक्रमणाचा पूर्णतः पाडाव करण्याचा निर्धार आकाशवाणीवरून जाहीर केला आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्यसंग्रामात देशाला सहभागी केले, तेव्हादेखील नियतीशी आणखी एक संकेतच केला गेला. इंदिरा गांधींनी पाकिस्तानची फाळणी घडवून पहिल्या फाळणीच्या वेदनेवर फुंकर घातली, त्याप्रमाणे सध्याच्या राज्यकर्त्यांनी कश्मीरातून विस्थापित झालेल्या पंडितांना त्यांचा हक्क व खोऱ्यातली घरे परत मिळावी यासाठी प्रत्यक्ष 'कृती'देखील करावी तरच फाळणीच्या वेदनेचा दाह शमेल

फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या
फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या
author img

By

Published : Aug 16, 2021, 9:24 AM IST

मुंबई - पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस फाळणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. देशाच्या फाळणीच्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाहीत म्हणून 14 ऑगस्ट हा दिवस 'फाळणी वेदना स्मृतिदिन' म्हणून ओळखला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना मोदी यांना फाळणीच्या वेदनेने अस्वस्थ केले व त्यांनी त्या कटू आठवणींना उजाळा दिला. मात्र फक्त त्या वेदनेतून आणखी एका फाळणीची बिजे रोवली जाऊ नयेत हे सध्याच्या राज्यकर्त्यांनी पाहायला हवे. त्यामुळे फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या की त्यांना कायमची तिलांजली द्यायची, यावर चिंतण होणे गरजेचे असल्याचे मत शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त केले आहे.

देश दुभंगला तशी मने दुभंगली ती कायमचीच. ही दुभंगलेली मने दुरुस्त करण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना लाहोरला 'बस' घेऊन गेले. तसे सध्याचे पंतप्रधान मोदी हेसुद्धा पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी अचानक गेले. म्हणजे दोन देशांतली फाळणीची वेदना संपावी आणि नवे पर्व सुरू व्हावे, असा विचार मोदींच्याही मनात होताच. आता त्यांनी त्या वेदनेची खपली उचकटून काढली. फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवूया व त्यासाठी 14 ऑगस्ट हा दिवस निवडला. 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन आहे. फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या की या स्मृतींना कायमची तिलांजली देऊन वेदना देणाऱ्यांवर प्रहार करायचा यावर 'चिंतन' झाले असते तर बरे झाले असते, असा टोला पंतप्रधान मोदींना लगावला आहे.

भारतीय जनता पक्षाचे लालकृष्ण आडवाणी हे एकमेव नेते फाळणीच्या वेदनेचे साक्षीदार आहेत. त्यांनी त्या काळात जे भोगले ते त्यांच्या पुढच्या प्रवासात अनेकदा उफाळून आले, पण फाळणीच्या वेदना जागवताना त्या वेदना भोगलेला महानायक कोण आहे? फाळणीवर उतारा म्हणून भाजपने पाकव्याप्त कश्मीर पुन्हा जिंकण्याचा निर्धार केला. अखंड हिंदुस्थानचा गजर केला. फाळणीच्या वेदनेवर तोच उतारा होता, पण फाळणीच्या वेदनेचा प्रतिशोध घेण्याचे राष्ट्रकार्य फक्त इंदिरा गांधी करू शकल्या.

फाळणीच्या वेदनेइतकेच कश्मिरी पंडितांच्या जखमांचे व्रणही देशाला अस्वस्थ करणारे-

नेहरूंच्या कन्या इंदिरा यांनी पंतप्रधान या नात्याने जेव्हा 3 डिसेंबर 1971 रोजी मध्यरात्रीनंतर पाकिस्तानी आक्रमणाचा पूर्णतः पाडाव करण्याचा निर्धार आकाशवाणीवरून जाहीर केला आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्यसंग्रामात देशाला सहभागी केले, तेव्हादेखील नियतीशी आणखी एक संकेतच केला गेला. इंदिरा गांधींनी पाकिस्तानची फाळणी घडवून पहिल्या फाळणीच्या वेदनेवर फुंकर घातली, त्याप्रमाणे सध्याच्या राज्यकर्त्यांनी कश्मीरातून विस्थापित झालेल्या पंडितांना त्यांचा हक्क व खोऱ्यातली घरे परत मिळावी यासाठी प्रत्यक्ष 'कृती'देखील करावी तरच फाळणीच्या वेदनेचा दाह शमेल असेही आवाहन शिवसेनेने केंद्र सरकारला केले आहे.

इंदिरा गांधींनी पाकिस्तानची फाळणी घडवून पहिल्या फाळणीच्या वेदनेवर फुंकर घातली. पाकिस्तानच्या द्विराष्ट्रवादाचा पायाच उखडून टाकला. फाळणीची वेदना होती व आहेच. फाळणीच्या वेदनेइतकेच कश्मिरी पंडितांच्या जखमांचे व्रणही देशाला अस्वस्थ करीत आहेत. त्यामुळे फाळणीच्या वेदनेचा दाह फक्त ' उक्ती ' ने शमणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष ' कृती ' देखील करावी लागेल. विद्यमान सत्ताधारी ती करणार आहेत काय? देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्याचा उत्सव वर्षातून एकदा साजरा होतो , पण फाळणीची वेदना सदैव मन जाळीत असते, ही आग कशी विझवणार? असा सवाल शिवसेनेने केंद्र सरकारला केला आहे.

विभाजन हे काही राजकारणाचा भाग किंवा खुशीखुशीने झालेले नाही-

हिंदुस्थान-पाकिस्तान नावाचे दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. दीडशे वर्षांच्या गुलामगिरीच्या बेडय़ा तोडण्यासाठी हिंदू आणि मुसलमान अशा दोन्ही समाजांनी रक्त सांडले. पण जसजसे स्वातंत्र्य जवळ येऊ लागले तसतसे हिंदू-मुसलमानांचे झगडे सुरू झाले व त्याचा शेवट द्विराष्ट्र निर्मितीत झाला, पण विभाजन हे काही राजकारणाचा भाग किंवा खुशीखुशीने झालेले नाही. ब्रिटिशांच्या 'फोडा आणि झोडा' या नीतीतूनच फाळणी झाली व आपल्या स्वातंत्र्याची ती अपरिहार्यता ठरली असल्याचेही सेनेन म्हटले आहे,

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.