Param bir singh : परमबीर सिंग यांनी गुन्हा मागे घेण्यासाठी 15 कोटींची मागितली लाच; व्यावसायिकाने केली पोलिसांकडे तक्रार - परमबीर सिंग तक्रार रुपीन बँकर
दोन व्यावसायिकांमध्ये सुरू असलेल्या भांडणात गुन्हा मागे घेण्यासाठी चक्क परमबीर सिंग ( Bribe allegation on Param bir singh ) यांनी एका व्यावसायिकाकडून 15 कोटी रुपयांची लाच मागितल्याविरोधात आता रुपीन हेमंत बँकर ( Rupin Hemant Banker complaint of param bir singh ) या व्यावसायिकांने पोलिसांकडे तक्रार केली आहे.
मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( Bribe allegation on Param bir singh ) यांचे आनखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. दोन व्यावसायिकांमध्ये सुरू असलेल्या भांडणात गुन्हा मागे घेण्यासाठी चक्क परमबीर सिंग यांनी एका व्यावसायिकाकडून 15 कोटी रुपयांची लाच मागितल्याविरोधात आता रुपीन हेमंत बँकर ( Rupin Hemant Banker complaint of param bir singh ) या व्यावसायिकांने पोलिसांकडे तक्रार केली आहे.
हेही वाचा - मुंबईसाठी पावसाळ्याचे २२ दिवस धोक्याचे, समुद्राला मोठी भरती
नेमकं काय आहे प्रकरण ? - कैलाश अग्रवाल आणि रुपीन हेमंत बँकर ( Rupin Hemant Banker complaint ) या दोन व्यावसायिकांमध्ये दुबईमध्ये वाद सुरू झालेला होता. ज्यात कैलाश अग्रवाल यांनी रुपीनकडून 35 कोटी रुपयांची मागणी केली होती. याशिवाय त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि त्याला दुबईहून अटक करण्यात आली होती. त्यानंतर, रुपीन हेमंत बँकर हे आपल्या कुटुंबासह मुंबईत पळून आले. मात्र, पोलिसांनी व्यावसायिक रुपिन हेमंत बँकर यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला. त्यानंतर परमबीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी 15 कोटींची मागणी करण्यास सुरुवात केली. अन्यथा रुपीन आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरुद्ध मोक्का कायदा लावण्याची धमकी दिली. रुपीन हेमंत बँकर यांनी पैसे देण्यास आणि सेटलमेंट करण्यास नकार दिल्यावर मोक्काला मंजुरी देण्यात आली.
पोलीस आयुक्तांकडे तक्रार - मोक्का कायदा लावण्याची धमकी देऊन परमबीर सिंग आणि खंडणीविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी 15 कोटी रुपये मागितल्याची तक्रार व्यवसायिक रुपीन हेमंत बँकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे. याशिवाय रुपीन हेमंत बँकर यांनी कैलास अग्रवाल यांच्याशी मोबाईल फोनवरून केलेल्या खंडणी कॉलचा कॉल रेकॉर्डिंग पोलीस आयुक्तांकडे देण्यात आलेला आहे.