ETV Bharat / city

मुंबईत 'या' तारखेपासून कार्यालय, लोकल सुरू करू शकता; शाळेला मुहूर्त 1जानेवारीचा - टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल

22 मार्च पासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मिशन बिगीन अंतर्गत मुंबईमधील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. याच वेळी सामान्य नागरिकांसाठी 1 नोव्हेंबरपासून ऑफिसेस, लोकल आणि 1 जानेवारी 2021 पासून शाळा सुरू करु शकतात, अशी सूचना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने एका अहवालाद्वारे मुंबई महापालिकेला केली आहे. शास्त्रीय मॉडेलवर ही तारीख काढल्याचे या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.

मुंबईत 1 नोव्हेंबरपासून ऑफिसेस, लोकल सुरू करू शकता;
author img

By

Published : Sep 6, 2020, 11:33 AM IST

मुंबई - मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. 22 मार्च पासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मिशन बिगीन अंतर्गत मुंबईमधील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. याच वेळी सामान्य नागरिकांसाठी 1 नोव्हेंबरपासून ऑफिसेस, लोकल आणि 1 जानेवारी 2021 पासून शाळा सुरू करु शकतात, अशी सूचना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने एका अहवालाद्वारे मुंबई महापालिकेला केली आहे. शास्त्रीय मॉडेलवर ही तारीख काढल्याचे या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सर्व सामान्य नागरिकांसाठी ट्रेन बंद आहेत. कार्यालये कमी कर्मचाऱ्यांमध्ये सुरू करण्यात आली आहेत. शाळा बंद आहेत. शहरातील वातावरण अद्यापही सामान्य झालेले नाही. अशावेळी सामान्य मुंबईकर शहरातील व्यवहार कधी सुरळीत होतील याची वाट बघत असताना मुंबईत सप्टेंबर महिन्यात कार्यालयांमध्ये उपस्थिती आणि परिवहन यंत्रणेची क्षमता या दृष्टीने शहर 30 टक्क्यांनी सुरू केली जाऊ शकते. ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत वाढवता येऊ शकते. शहर आणखी हळूहळू खुले केले पाहिजे आणि 1 नोव्हेंबरच्या सुमारास पूर्ण कार्यान्वित व्हावे, असे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने शास्त्रीय मॉडेलवर अहवाल तयार केला आहे.

सार्वजनिक वाहतुकीमध्ये सामाजिक अंतराचे निकष पाळले पाहिजेत आणि मास्कचा अनिवार्य वापर, हातांची स्वच्छता आणि गाड्या व कामाच्या ठिकाणी नियमित निर्जंतुकीकरण यासारख्या स्वच्छतेच्या उपायांचे पालन केले पाहिजे, असंही अहवालात म्हटलं आहे. यावर्षी डिसेंबर किंवा पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत जवळजवळ 75 टक्के झोपडपट्टी परिसरातील लोकांमध्ये तर अन्य भागातील 50 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार होतील, असे म्हटले आहे. 1 जानेवारी 2021 पासून शाळा सुरु करु शकतात असेही या अहवालात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.