ETV Bharat / city

Rumors : पालिका आयुक्त चहल यांना आयकर विभागाच्या नोटीसीची अफवा, पोलिसांत तक्रार करणार

author img

By

Published : Mar 4, 2022, 9:48 PM IST

महाविकास आघाडीमधील नेते आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर कधी आयकर विभागाची धाड किंवा ईडीकडून नोटीस येईल हे सांगता येत नाही. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांबद्दलही आता अशीच कारवाई होऊ शकते, हे नाकारता येत नाही. अशातच मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल ( Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal ) यांना आयकर विभागाची नोटीस आल्याची चर्चा पालिका वर्तुळात आज सुरु होती. मात्र त्यांना कोणतीही नोटीस मिळालेली नाही. अफवा पसरवणाऱ्याविरोधात पोलिसात तक्रार करणार असल्याचे स्वतः चहल यांनी स्पष्ट केले आहे.

Mumbai Municipal Commissioner Chahal
पालिका आयुक्त चहल

मुंबई - महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह त्यांच्या जवळचे नातेवाईक, कंत्राटदार यांच्यावर आयकर विभागाने धाड टाकली होती. त्यानंतर आज शुक्रवारी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल ( Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal ) यांना आयकर विभागाने नोटीस दिल्याची चर्चा महापालिका मुख्यालयात सुरू होती. मात्र आयकर विभागाची कुठलीही नोटीस आली नसून अफवा पसरवणाऱ्या विरोधात पोलीस तक्रार करणार असल्याचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे.

स्थायी समिती अध्यक्षांवर धाड -

२०१९ च्या निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याने शिवसेना आमदार यामिनी जाधव तसेच मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मनी लाॅड्रींग केल्याचा ठपका ठेवत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने शुक्रवार २५ फेब्रुवारी रोजी पहाटे ६ वाजता धाड टाकली. सोमवारी २८ फेब्रुवारीपर्यंत तब्बल ७२ तास ही धाड सुरू होती. या धाडीदरम्यान जाधव यांनी स्वतःच्या आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या नावे ३६ ठिकाणी मालमत्ता विकत घेतल्या असून त्याची किंमत १३० कोटी रुपये आहे. कंत्राटदारांकडून चुकीच्या पद्धतीने रोख रक्कम काढून घेण्यात आली आहे. याचा वापर मालमत्ता खरेदीसाठी आणि बेहिशेबी बिले भरण्यासाठी करण्यात आला आहे. या कंत्राटदारांनी तब्बल ५० कोटी रुपयांची उलाढाल केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. वरील गैरप्रकारांमुळे एकूण २०० कोटी रुपयांचा एकूण व्यवहार समोर आला आहे. या शोध अघोषित २ कोटींची रोख रक्कम आणि दीड कोटींचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे.

पोलीसांकडे तक्रार करणार -

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावरील आयकर विभागाने धाड टाकल्याचा प्रकार ताजा असतानाच याच प्रकरणात चौकशी करण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांना आयकर विभागाने चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आल्याची चर्चा आज पालिका मुख्यालयात सुरू होती. दरम्यान अशी कोणतीही नोटीस आली नसल्याचे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. अशी अफवा पसरवणाऱ्या विरोधात पोलीसांकडे तक्रार करणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

हेही वाचा : Mega blocks on all Three Railway Lines : रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.