ETV Bharat / city

मुंबईत वाढतेय आरएसव्ही व्हायरसची भीती, लक्षणे दिसल्यास चाचणी करण्याचे आयुक्त काकाणी यांचे आवाहन - symptoms of RSV virus

मागील दीड वर्षापासून कोरोनाशी लढा सुरु आहे. सध्या कोरोना नियंत्रणात आहे. मात्र आरएसव्ही व्हायरसचा प्रसार वाढण्याची भीती आहे. आरएसव्ही हा कोरोनासारखा जीवघेणा व्हायरस नाही. मात्र वेळेत उपचार घेणे आवश्यक आहे. मान्सून संपला असला, तरी काही भागात पाऊस पडतो आहे. आरएसव्ही व्हायरस हा वातावरणातील बदलामुळे होत असून तो व्हायरल फिव्हरचा प्रकार आहे, घाबरून जाण्याचे कारण नाही, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.

RSV virus in Mumbai; Appeal of Commissioner Kakani to test if symptoms appear
मुंबईत कोरोनानंतर आरएसव्ही व्हायरसची भीती, लक्षणे दिसल्यास चाचणी करण्याचे आयुक्त काकाणी यांचे आवाहन
author img

By

Published : Nov 9, 2021, 2:19 AM IST

मुंबई - सर्वत्र गेले दीड वर्षापासून कोरोनाचा प्रसार सुरू आहे. हा प्रसार कमी होत असतानाच आता आरएसव्ही व्हायरसचा प्रसार वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हा व्हायरस वातावरणातील बदलामुळे होत असून तो व्हायरल फिव्हरचा प्रकार आहे. मुंबईकरांनी घाबरण्याचे कारण नाही, लक्षणे दिसल्यास चाचणी करून घ्यावी असे आवाहन पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.

आरएसव्ही व्हायरस वाढण्याची भीती -

मागील दीड वर्षापासून कोरोनाशी लढा सुरु आहे. सध्या कोरोना नियंत्रणात आहे. मात्र आरएसव्ही व्हायरसचा प्रसार वाढण्याची भीती आहे. आरएसव्ही हा कोरोनासारखा जीवघेणा व्हायरस नाही. मात्र वेळेत उपचार घेणे आवश्यक आहे. मान्सून संपला असला, तरी काही भागात पाऊस पडतो आहे. आरएसव्ही व्हायरस हा वातावरणातील बदलामुळे होत असून तो व्हायरल फिव्हरचा प्रकार आहे, घाबरून जाण्याचे कारण नाही, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.

चाचणीकरून घेण्याचे प्रशासनाचे आवाहन -

आरएसव्ही व्हायरस नियंत्रणात येऊ शकतो. कुठलाही ताप असला, तरी उपचार घेणे आवश्यक आहे. त्वचेला खाज येणे, ताप, खोकला ही आरएसव्हीची लक्षणे आहेत. कोविडचा रिपोर्ट निगेटीव्ह असला तरी वातावरण बदलाने व्हायरसची लागण होण्याचा शक्यता अधिक आहे. मुंबईकर सध्या वातावरण बदलामुळे ताप- खोकल्याने त्रस्त आहेत. मुंबईकरांनी लक्षणे दिसताच कोरोनासोबतच इतर व्हायरसचीही चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

पाच जम्बो सेंटर सुरु -

कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने मुंबईतील फक्त पाच कोरोना जंबो सेंटर सुरु ठेवण्यात आले आहेत. रुग्णालयातील बहुतांशी कोविड वॉर्ड कमी करून आता नॉन कोविड वॉर्ड सुरु करण्यात आले आहेत. गरज असेल तिथेच हे वॉर्ड सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

हेही वाचा - आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : एनसीबीकडून प्रभाकर साईलची सात तास चौकशी; साईलचे वकील म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.