ETV Bharat / city

बीएमसी निवडणुकीत ब्राह्मण समाजातील इच्छुकांना उमेदवारी देणार - आठवले - rpi bhrahman candidate news

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणांना विरोध केला नाही. ब्राह्मण आणि सवर्ण समाजातील ज्या लोकांच्या मनात जातीभेदाचा विचार आहे, तो विचार त्यांचे प्रबोधन करून नष्ट केला पाहिजे. त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू असून आज ब्राह्मण समाजातर्फे सत्कार स्वीकारताना सर्व समाजात परिवर्तन होत असल्याचा विश्वास वाटत आहे, असे रामदास आठवले म्हणाले.

रामदास आठवले
रामदास आठवले
author img

By

Published : Oct 6, 2021, 7:21 PM IST

मुंबई - ब्राह्मण, मराठा आणि सवर्णांमधील गरिबांना ज्याचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांच्या आता आहे त्यांना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, अशी मागणी आम्ही केली होती. सर्वच ब्राह्मण श्रीमंत नाहीत. ब्राह्मणांमध्ये गरिबांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व सवर्णांमधील गरिबांसाठी शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के सवर्णांना आरक्षण देणारा केंद्र सरकारचा कायदा 3 वर्षांपूर्वी केला आहे. त्या कायद्याचा लाभ ब्राह्मण समाजातील गरिबांनी घ्यावा, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

'सर्वांनाच मुंबईत राहण्याचा अधिकार'

ब्राम्हण समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणारे आणि मुंबईत परप्रांतीयांना संविधानाचे संरक्षण मिळवून देणारे संघर्षनायक म्हणून आठवले यांचा ब्राह्मण समाजातर्फे समाज पुरस्काराने गौरव करण्यात आला. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष ब्राह्मण समाजातील उमेदवारांना 5 जागांवर रिपाइंची उमेदवारी देणार असल्याची घोषणा यावेळी आठवले यांनी केली. उत्तर प्रदेशातून ब्राह्मण आणि सर्व जातीचे लोक मुंबईत येऊन राहिले. मिळेल ते काम करून कष्ट करीत राहिले. त्यातील काही लोक व्यापारी, बिल्डर, उद्योजक आणि काही उच्च शिक्षित झाले. मात्र मध्यंतरी मुंबईत काही लोकांनी उत्तर प्रदेशातील लोकांना मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, अशी धमकी दिली. तेव्हा सर्वात आधी माझ्या रिपब्लिकन पक्षाने ईट का जवाब पत्थरसे देंगे असा प्रतिइशारा देऊन उत्तर प्रदेशातून मुंबईत आलेल्या बांधवांना पाठिंबा दिला होता. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने देशात कुठेही उद्योगधंदा, नोकरी आणि वास्तव्य करण्याचा अधिकार सर्व भारतीयांना दिला आहे. उत्तर प्रदेशातून आलेल्या ब्राह्मण आणि सर्व जातींना मुंबईत राहण्याचा अधिकार आहे, असे आठवले म्हणाले.

'सर्व समाजात परिवर्तन होत असल्याचा विश्वास'

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणांना विरोध केला नाही. ब्राह्मण आणि सवर्ण समाजातील ज्या लोकांच्या मनात जातीभेदाचा विचार आहे, तो विचार त्यांचे प्रबोधन करून नष्ट केला पाहिजे. त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू असून आज ब्राह्मण समाजातर्फे सत्कार स्वीकारताना सर्व समाजात परिवर्तन होत असल्याचा विश्वास वाटत आहे. दलित, सवर्ण, ब्राम्हण यांतील सामाजिक भेदभाव मिटत आहे. समाजात एकोपा निर्माण होईल, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील समता प्रस्थापित होईल त्या दिशेने आपली वाटचाल असावी, असे आवाहन यावेळी आठवले यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.