मुंबई- राज्यपाल महोदयांचा केवळ २५०-३५० वर्षापूर्वीचा इतिहास कच्चा असल्याचं वाटायचे. पण त्यांचं कालचं वक्तव्य बघता मागील ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार यांनी ( Rohit Pawar Slammed MH governor ) केली.
रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले, की मोदी साहेब हे मोठे नेते असून देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केलं नाही, असं नाही. आज कळस दिसत असेल तर त्याचा भक्कम पाया हा आधीच घातला गेलेला आहे आणि त्यात आजपर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांचा वाटा आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. तसंच देश उभारणीत केवळ विशिष्ट नेत्याचंच योगदान असतं असं नाही तर आपली संस्कृती आणि सर्वच भारतीय नागरीकांचे योगदान तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून 'आधी भारतीयांना किंमत नव्हती' असं वक्तव्य घटनात्मक पदावरील व्यक्तीने करणं ही अत्यंत निंदनीय बाब ( Rohit Pawar Slammed Bhagat singh ) आहे.
-
राज्यपाल महोदयांचा केवळ २५०-३५० वर्षापूर्वीचा इतिहास कच्चा असल्याचं वाटायचं पण त्यांचं कालचं वक्तव्य बघता मागील ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो. मोदी साहेब हे मोठे नेते असून देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केलं नाही, असं नाही.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">राज्यपाल महोदयांचा केवळ २५०-३५० वर्षापूर्वीचा इतिहास कच्चा असल्याचं वाटायचं पण त्यांचं कालचं वक्तव्य बघता मागील ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो. मोदी साहेब हे मोठे नेते असून देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केलं नाही, असं नाही.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 5, 2022राज्यपाल महोदयांचा केवळ २५०-३५० वर्षापूर्वीचा इतिहास कच्चा असल्याचं वाटायचं पण त्यांचं कालचं वक्तव्य बघता मागील ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो. मोदी साहेब हे मोठे नेते असून देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केलं नाही, असं नाही.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 5, 2022
यापूर्वीही शिंदे गटासह भाजपवर केली होती टीका-विरोधी पक्षात बसलो असलो, तरी सर्व आमदारांनी आपल्या मतदार संघाचे जाऊन काम करावे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये ( Elections ) विजय आपलाच होईल, असा विश्वास शरद पवार यांनी आमदारांना दिला आहे. शरद पवार यांनी महाविकास आघाडी तयार करत पक्ष जोडले. मात्र, गेल्या 9 दिवसात संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने पक्ष तोडलेला पाहिला आहे. बंडखोर आमदारांना केंद्रीय तपास यंत्रणेच्या धाक दाखवून किंवा आमिष दाखवून हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था वापरली गेली. मात्र, या सर्व गोष्टी सामान्य माणसाला कळतात असे बैठकीतून शरद पवारांनी सर्व आमदारांना सांगितले असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी यापूर्वी दिली होती.