ETV Bharat / city

लोकसभेतील पिछेहाटीबाबत राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार म्हणतात..

बारामती लोकसभा निकालाबाबत बोलताना ते म्हणाले मोदी-शाह आणि फडणवीस यांनी बारामती जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते. परंतु जनतेचे मन सुप्रिया सुळे यांनी कामांनी जिंकले आहे. त्यामुळेच गतवर्षीपेक्षा यंदा लाखाहून अधिक मताधिक्य घेऊन सुप्रिया सुळे जिंकणार आहेत, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला

author img

By

Published : May 23, 2019, 5:40 PM IST

Updated : May 23, 2019, 6:55 PM IST

रोहित पवार

मुंबई - लोकसभा निवडणुकीचे निकाल प्रतिकूल येत असताना राष्ट्रवादीने आपला आत्मविश्वास उंचावण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी पराभवाने हिरमसून जायची गरज नाही, अशी प्रतिक्रिया ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. ते म्हणाले, विजयाचा उन्माद डोक्यात जाता कामा नये. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देऊन निश्चितपणे आगामी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवू, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.

मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा भाजपचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पराभव केला आहे. याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, आम्ही निश्चितपणे काही प्रमाणात कमी पडलो आहोत. परंतु मावळची जागा आम्ही कधी जिंकली होती, असा त्यांनी प्रश्न विचारला. पुढे, ते म्हणाले, या निवडणुकीच्या निमित्ताने आमचे मावळ मतदारसंघात चांगले नेटवर्क तयार झाले आहे. बारामती लोकसभा निकालाबाबत बोलताना ते म्हणाले मोदी-शाह आणि फडणवीस यांनी बारामती जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते. परंतु सुप्रिया सुळे यांच्या कामांनी जनतेचे मन जिंकले आहे. त्यामुळेच गतवर्षीपेक्षा यंदा लाखाहून अधिक मताधिक्य घेऊन सुप्रिया सुळे जिंकणार आहेत, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. अहमदनगर दक्षिण जागेसाठी मोठे प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. अपयशाने खचून जाणार नाही, नव्या जोमाने काम करू असे पवार म्हणाले.

मावळमध्ये पवार कुटुंबीयांची लागली होती प्रतिष्ठा पणाला -
मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून मावळ लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. या बालेकिल्ल्यात पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, तरीही पार्थ पवार यांचा पराभव झाला आहे. या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा 2 लाखांच्या मताधिक्याने विजय झाला आहे. त्यामुळे हा पवार कुटुंबीयांना मोठा धक्का मानला जात आहे.

Intro:पराभव विसरून विधानसभेला सामोरे जाणार
राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांचा विश्वास
मुंबई :लोकसभा निवडणुकीचे निकाल प्रतिकूल येत असताना राष्ट्रवादीने आपला आत्मविश्वास उंचावण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत पराभवाने हिमालय जायची गरज नाही आणि विजयाचा उन्माद डोक्यात जाता कामा नये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देऊन निश्चितपणे विजय मिळवून विश्वास रोहित पवार यांनी ईटीव्ही शी बोलताना व्यक्त केला मावळ लोकसभा विधान विधानसभा लोकसभा मतदारसंघाबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले आम्ही निश्चितपणे काही प्रमाणात कमी पडले असून परंतु मावळची जागा आम्ही कधी जिंकलं होतं या निवडणुकीच्या निमित्ताने आमचे या मतदारसंघात चांगले नेटवर तयार झाले बारामती लोकसभा निकालाबाबत बोलताना ते म्हणाले मोदी शहा आणि फडणवीस यांनी बारामती जिंकण्याचे स्वप्न दाखवले होते परंतु सुप्रिया सुळे यांच्या कामांनी जनतेचे मन जिंकले होते त्यामुळेच गतवर्षीपेक्षा यंदा लाखापेक्षा जास्त मता दी घेऊन सुप्रिया सुळे जिंकणार आहेत असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला अहमदनगर दक्षिण जागेसाठी मोठे प्रयत्न केले परंतु यश मिळाले.
त्याने खचून जाणार नाही नव्या जोमाने काम करू असे रोहित पवार शेवटी म्हणाले.

Body:MH_Loksabha_RohitPawar121_7204684

Conclusion:
Last Updated : May 23, 2019, 6:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.