ETV Bharat / city

Opposition Leader Ajit Pawar on District : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे अधिकार जिल्हास्तरावर : विरोधी पक्ष नेते अजित पवार - CM Eknath Shinde

सत्ता स्थापन होताच भाजप पुसस्कृत शिंदे सरकारने जिल्हा नियोजन समितीचा ( Funding of District Planning Committee ) निधी ( Hold Funds From District Planning committee ) रोखला. यावर भाष्य करताना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) म्हणाले की, मागील सरकारने जिल्हा नियोजन समितीला जो निधी दिला होता. या निधीचे काय करायचे आणि काय नाही हा जरी सरकारचा अधिकार असला तरी खरोखरच हा निधी रोखला आहे का? तसेच तो का रोखला गेला याबाबत मुख्यमंत्र्यांना ( CM Eknath Shinde ) विचारू, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामती पत्रकारांशी बोलताना दिली.

Leader of the Opposition Ajit Pawar
विरोधी पक्ष नेते अजित पवार
author img

By

Published : Jul 9, 2022, 2:17 PM IST

बारामती : शिवसेनेतून बंड करीत भाजपशी हात मिळवणी करून एकनाथ शिंदे गटाने सत्ता स्थापनेचा दावा केला. सत्ता स्थापन होताच सरकारने जिल्हा नियोजन समितीचा निधी रोखला ( Hold Funds From District Planning committee ). यावर भाष्य करताना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) म्हणाले की, याबाबतची बातमी मी वाचली असून, मुख्यमंत्र्यांशी ( CM Eknath Shinde ) चर्चा करणार आहे. मागील सरकारने जिल्हा नियोजन समितीला जो निधी दिला होता. या निधीचे काय करायचे आणि काय नाही हा जरी सरकारचा अधिकार असला तरी खरोखरच हा निधी रोखला आहे का? तसेच तो का रोखला गेला याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारू, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामती पत्रकारांशी बोलताना दिली.

आघाडीचे निर्णय वरिष्ठ पातळीवरून होतील : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना महाविकास आघाडी कशी सामोरे जाणार याबाबत बोलताना पवार म्हणाले की, राज्याच्या वेगवेगळ्या भागात स्थानिक पातळीवर राजकीय परिस्थिती व स्थानिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे म्हणणे वेगवेगळे असते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून जिल्हास्तरावर अधिकार दिले आहेत. मात्र, आघाडीच्या वतीने राज्यस्तरावरून जो निर्णय होईल, त्यानुसार निवडणुकांना सामोरे जाऊ.

ओबीसी आरक्षण प्रश्न न्यायालयात : ओबीसी आरक्षणासंदर्भात बोलताना पवार म्हणाले की, सध्या ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात आहे. भाटिया समितीमार्फत इम्पिरेटल डाटा तयार करण्यात आला आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ओबीसी वर्गाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, असे आमचेही म्हणणे आहे.

सरकारने काळजी घ्यावी : कोकणासह राज्यातील इतर भागांत मोठ्या प्रमाणात पावसामुळे जीवित व वित्तहानी झाल्याच्या घटनेवर बोलताना पवार म्हणाले की, दरवर्षी पावसाळ्यात अशा घटना घडत असतात. पावसाळ्यात अशा घटना कधी घाट भागात तर ढगफुटी होऊन काही भागात घडत असतात. अशा घटना घडू नयेत यासाठी त्या त्या भागातील सरकारने काळजी घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा : माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

हेही वाचा : Cloudburst Situation In Nanded : नांदेड शहरासह अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस

हेही वाचा : Nagpur Crime News : दोन बहिणींचा संशयास्पद मृत्यू प्रकरण, पोटात विष गेल्याने मृत्यू झाल्याची शक्यता

हेही वाचा : Pune Devotees go missing in Amarnath : अमरनाथ ढगफुटी.. पुण्यातील दोन भाविक बेपत्ता.. शोध सुरु

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.