ETV Bharat / city

बॅंकाच्या कर्ज वसुलीतून सवलत द्या; रिक्षा-टॅक्सी चालकांचे मुंबईत आंदोलन

author img

By

Published : Sep 2, 2021, 8:42 PM IST

गेल्या वर्षी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नऊ महिने रिक्षा-टॅक्सीची सेवा बंद असल्याने रिक्षा टॅक्सी चालकांवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र, सध्या टॅक्सी-रिक्षाचा व्यवसाय रुळावर येत असताना बँकेमार्फत कर्ज काढून विकत घेतलेल्या रिक्षा व टॅक्सी चालकांना बँकेचे हप्ता भरायला पैसे नाहीत. आज बँकेचे अधिकारी कर्ज आणि त्यावरील व्याज मागण्यासाठी रिक्षा व टॅक्सी चालकांच्या मागे ससेमिरा लावला आहे.

Rickshaw-taxi drivers protest at mumbai
रिक्षा-टॅक्सी चालकांचे मुंबईत आंदोलन

मुंबई - एकीकडे कोरोना संकटाचा सामना करताना, दुसरीकडे बँक कंपन्यांकडून कर्जासाठी लागलेला ससेमीरामुळे टॅक्सी व रिक्षा चालक हैराण झाले आहेत. राज्य शासनाने नुकतेच टॅक्सी रिक्षा वाहने रस्त्यावर उतरण्यास समंती दर्शवली. मात्र, बॅंकांकडून कर्जासाठी सुरु असलेल्या हप्तावसुलीला कंटाळून आज (गुरूवार) मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांनी शासनाच्या निषेधार्थ उग्र आंदोलन केले. दरम्यान, शेतकऱ्यांप्रमाणे आम्हालाही दोन लाखांपर्यंत कर्जमाफी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

बॅंकाच्या कर्ज वसुलीतून सवलत द्या; रिक्षा-टॅक्सी चालकांचे मुंबईत आंदोलन

आझाद मैदानांवर केले आंदोलन -

गेल्या वर्षी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नऊ महिने रिक्षा-टॅक्सीची सेवा बंद असल्याने रिक्षा टॅक्सी चालकांवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र, सध्या टॅक्सी रिक्षाचा व्यवसाय रुळावर येत असताना बँकेमार्फत कर्ज काढून विकत घेतलेल्या रिक्षा व टॅक्सी चालकांना बँकेचे हप्ता भरायला पैसे नाहीत. आज बँकेचे अधिकारी कर्ज आणि त्यावरील व्याज मागण्यासाठी रिक्षा व टॅक्सी चालकांच्या मागे ससेमिरा लावला आहे. काहीना तर तुमची गाडी का जप्त करु नये अशा प्रकारची नोटीस देण्यात आलेली आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ राज्यभरातील रिक्षा टँक्सी चालकांचे दोन लाख रुपयांचे कर्जमाफ करण्याची मागणी रिक्षा-टॅक्सी चालकांकडून करण्यात येत आहे. याबाबत राष्ट्रीय उत्तर भारतीय समाज पार्टीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब आणि परिवहन आयुक्त यांना निवेदन सुद्धा देण्यात आले आहे. मात्र, तरी सुद्धा या मागणीवर सरकारने अद्याप दखल घेतली नाही. यामुळे सरकारविरोधात आज (गुरूवार) आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले आहे.

नऊ महिने रिक्षा टॅक्सीचे मीटर बंद -

राष्ट्रीय उत्तर भारतीय समाज पार्टीचे नेते विजय कुमार शर्मा यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील आर्थिक व्यवस्थेमध्ये मुंबईतील तसेच महाराष्ट्रातील रिक्षा व टॅक्सी चालकांचा महत्वाचा वाटा आहे. तसेच कोरोना महामारीच्या या कालावधीमध्ये त्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्यांच्या परीने लोकाची सेवा करण्याचा प्रयत्न केला. यातील बरेचसे रिक्षा चालक व टॅक्सी चालक यांनी परवाना मिळाल्याने रिक्षा व टॅक्सी चालक यांनी बँकेमार्फत कर्ज काढून रिक्षा व टॅक्सी घेवून त्यांचे तसेच त्यांच्या कुटुंबियाचे पोट भरण्याचा प्रयत्न ते करत आहेत. कोरोना महामारीमुळे लागणाऱ्या लॉकडाऊनमुळे रिक्षा व टॅक्सी चालकांचे अतोनात हाल होत आहेत. कारण लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये यांचा व्यवसाय पूर्णपणे बंद झाल्याने सर्वच कर्ज काढून घेतलेल्या चालकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे. कारण लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मिळेल ते काम करून रिक्षा व टॅक्सी चालकांनी त्यांच्या कुटुंबियाचा सांभाळ करण्याचा प्रयत्न केला. परंतु रिक्षा व टॅक्सीसाठी काढलेले कर्ज ते भरु शकले नाहीत, कारण त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ९ महिने ठप्प झाला होता.

'२ लाख रुपयांचे कर्ज माफ करा' -

कोणत्याही बँकेचे अधिकारी हे काहीही ऐकायला तयार नाहीत. आताच व्यवसाय सुरू झाला आहे, आणि लगेच बँकेचे अधिकारी कर्ज आणि त्यावरील व्याज मागण्यासाठी रिक्षा व टॅक्सी चालकांच्या मागे ससेमिरा लावला आहे. काहींना तर तुमची गाडी का जप्त करू अशा प्रकारची नोटीस देण्यात आलेली आहे. काहींना तर बँकेकडून आलेली माणसे धमकी देण्याचा प्रयत्न करीत आहे, घरी येऊन लोकांसमोर तमाशा करत असल्याचा घटना घडत आहे. शासनाला विनंती आहे की सर्व रिक्षा व टॅक्सी चालकांचे कमीत कमी दोन लाख रुपयांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी राष्ट्रीय उत्तर भारतीय समाज पार्टीचे नेते विजय कुमार शर्मा यांनी केली आहे.

हेही वाचा - एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, दोन महिन्यांपासून रखडलेले वेतन मिळणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.