मुंबई - सततच्या सीएनजी दरवाढीविरोधात आज महानगर गॅस लिमिटेड कंपनी कार्यालयासमोर रिक्षा टॅक्सी चालकांकडून काल जोरदार आंदोलन करण्यात आले. येत्या 15 ते 20 दिवसांत सीएनजी दराबाबत शासनाकडून सकारात्मक निर्णय झाला नाही तर, रिक्षा टॅक्सी चालकांच्या कुटुंबासह सरकार विरोधात रस्त्यावर उतरू, असा सज्जड इशारा मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिला.
हेही वाचा - भाजप आमदार जयकुमार गोरेंवर अटकेची टांगती तलवार, कोर्टाचा आज निर्णय अपेक्षित
20 दिवसांत प्रश्न सोडवा - तिकडे प्रवासी भाडे स्थिर असताना सीएनजी चे दर 25 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे, आज रिक्षा व टॅक्सी चालकांचे मोठे नुकसान होत आहे. सीएनजीवर चालणाऱ्या टॅक्सी व रिक्षांना अनुदानित दराने गॅस पुरवठा करण्याची मागणी आम्ही गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडे केली होती. मात्र, आमच्या मागणीची दखल न घेतल्यामुळे आज आम्हाला वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये असलेल्या महानगर गॅस लिमिटेडच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करावे लागले, अशी माहिती मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिला.
सीएनजीच्या सतत वाढत्या दराबाबत महानगर गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना आम्ही काल आपल्या मागण्याचे निवेदन देऊन रिक्षा टॅक्सी चालकांचा समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून टॅक्सी - रिक्षा चालकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा आहे. आम्ही 15 ते 20 दिवसांची वाट पाहू. यातून सकारात्मक निर्णय होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. निर्णय न झाल्यास रिक्षाचालक व त्यांच्या कुटुंबासोबत आम्ही रस्त्यावर उतरू आणि याला जबाबदार सरकार असणार आहे, असा इशारा शशांक राव यांनी दिला.
हेही वाचा - मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उत्तर भारतीयांची मते निर्णायक ठरणार?