मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आले होते. या ड्रग्ज कनेक्शनमध्ये सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती शोविक या प्रकरणी अटकही झाली होती. ते दोघेही आता जामिनावर बाहेर आहेत. मात्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती आज एनसीबी कार्यालयात आली होती.
हजेरी लावण्यासाठी एनसीबी कार्यालयात -
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी तपास सुरू असताना हा तपास अंमली पदार्थांपर्यंत गेला. त्यानंतर सुशांतची मैत्रिण अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती या दोघांना नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) अटक केली होती. रियाला आणि शोविकला काही जामीन मिळाला होता. मात्र, त्यांना एनसीबी कार्यालयात हजरी लावावी लागणार होती. त्यानुसार रिया आज एनसीबी कार्यालयात हजर राहिली होती. यावेळी रियासोबत तिच्या भाऊ शौविक चक्रवर्ती आणि वडीलही सोबत होते.
ड्रग्ज प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानंतर रिया 7 ऑक्टोबरला घरी परतली होती. 8 सप्टेंबरला एनसीबीने अटक केल्यापासून रिया भायखळा कारागृहात होती. रियाला एक लाख आणि अन्य दोघांना 50 हजारांच्या जातमुचकल्यावर हा जामीन मंजूर झाला होता.
या कलाकारांची यापूर्वी झाली होती चौकशी -
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपास केला जात असताना बॉलिवूडमधल्या अभिनेत्रींना समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, रिया चक्रवर्ती, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रित सिंग या अभिनेत्रींची चौकशीही झाली आहे. त्यात रिया चक्रवतीला तुंरुगाची हवाही खावी लागली होती.
सुशांतसिंह आत्महत्या आणि ड्रग्ज कनेक्शन-
एनसीबी सुशातसिंह आत्महत्या प्रकरणी ड्रग्ज कनेक्शनचा तपास करत आहे. त्यानुसार पहिल्या दिवसापासून एनसीबी आक्रमक दिसली आहे. अनेक ड्रग्ज डिलर्सना ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यातूनच त्यांचे बॉलिवूड कनेक्शनही समोर आले होते.
दीपिका पादुकोणच्या मॅनेजरची चौकशी -
अभिनेत्री दीपिका पादुकोणची माजी मॅनेजर करिश्मा प्रकाशची एनसीबीने चौकशी केली होती. एनसीबीने यापूर्वी सप्टेंबरमध्ये करिश्मा प्रकाश हिचा जवाब नोंदवला होता. दीपिका व्यतिरिक्त एनसीबीने सुशांतच्या मृत्यूच्या चौकशीत ड्रग संबंधित प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सारा अली खानवरही प्रश्न केला आहे. एनसीबीने तिन्ही अभिनेत्रींचे फोनही जप्त केले आणि त्यांना फॉरेन्सिक विभागात तपासासाठी पाठविले होते. सुशांत हा 14 जून रोजी मुंबईतील त्यांच्या फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूची एनसीबी, सीबीआय आणि ईडी चौकशी करीत आहेत.
फिरोज नाडियाडवालाही बजावले होते समन्स -
यापूर्वी बॉलिवूड निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्या घरी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) छापा टाकत, ड्रग्ज जप्त केले होते. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. तेव्हापासून एनसीबीकडून बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खोदण्याचे काम सुरु आहे.
अमली पदार्थ प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपालची चौकशी-
बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल व त्याची प्रेयसी गॅब्रियल या दोघांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यांची चौकशीही झाली होती. माझे अमली पदार्थांच्या संदर्भात काहीही घेणे देणे नाही. माझ्या घरात जे औषध मिळाले आहे, त्याचे प्रिस्क्रिप्शन माझ्याकडे आहे, तसेच ते एनसीबीला दिले आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेता अर्जुन रामपाल यांने मा ध्यमांशी बोलताना दिली होती. अर्जुनचा मित्र पॉल बार्टल याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली होती. तसेच अर्जुन रामपाल याची प्रेयसी गॅबरीयल हिची सलग दोन दिवस चौकशी करण्यात आली होती.