ETV Bharat / city

महाराष्ट्रातील जनतेला धान्याऐवजी मिळणार पीठ : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नागरिकांना धान्याऐवजी पीठ कसे देता येईल याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती ट्विट करुन दिली आहे. त्यासह शेतीची कामे करण्यासाठी लॉकडाऊनमध्ये निर्बंध नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Baluu
बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Mar 26, 2020, 11:53 AM IST

मुंबई - महाराष्ट्रातील संचारबंदीच्या तिसऱ्या दिवशी जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जीवनावश्यक वस्तू वेळेत आणि पुरेशा प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचतील यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. धान्याच्या ऐवजी थेट पीठ नागरिकांना कसे मिळेल, याबाबतीतही ही सूक्ष्म नियोजन सुरू असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करुन दिली आहे.

Baluu
बाळासाहेब थोरात यांनी केले ट्विट
केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून जनतेला स्वस्त दरात धान्य पुरवठा केला जाणार आहे. धान्याच्या ऐवजी थेट पीठ नागरिकांना कसे मिळेल, याबाबतीतही ही नियोजन सुरू असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारकडून दरवर्षी मार्चअखेरीस रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाच्या संकटातून जनतेला सावरण्यासाठी झटत आहेत.
यावर्षीचे रेडीरेकनर दर 31 मार्चला जाहीर होणार नाही. कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्र मुक्त झाल्यानंतर हे दर जाहीर केले जातील. शेतीची कामे करण्यासाठी लॉकडाऊनमध्ये निर्बंध नाही. गव्हाची कापणी करण्यासाठी पंजाबहून जे हार्वेस्टिंग मशीन येथे आलेले आहेत, त्यांनाही पुरेशा इंधनाची उपलब्धता करून दिली जाईल, तशा सूचना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. पेट्रोल पंपांवर हार्वेस्टिंग मशिनरीला इंधन दिले जाईल. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवू नये, अशा आशयाच्या सूचना आम्ही प्रत्येक ठिकाणच्या जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांची ओळख व्हावी यासाठी पासची उपलब्धता करून ही वाहतूक सुरळीत केली जाते आहे, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.