मुंबई : शरद पवार यांच्या निवासस्थानी बोलावलेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक संपली आहे. नवाब मलिक यांच्या पालक मंत्री पदाचा कार्यभार दुसऱ्यांकडे देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. धनंजय मुंडे आणि प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पालकमंत्री देण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवा असा निर्णय झाला. परभणीचे पालक मंत्री पदाचा कार्यभार धनंजय मुंडे तर गोंदियाच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार प्राजक्त तनपुरेंकडे देणार असे बैठकीत ठरवण्यात आले. मंत्री जयंत पाटील यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली.
पात्र नवाब मलिक यांचा राजीनामा सरकार घेणार नाही
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे लागलेले निकाल ( Five State Election Result 2022 ) तसेच राज्यात होत असलेल्या महत्वाच्या घडामोडींसंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज महत्वाची बैठक बोलावली ( Sharad Pawar Called Important Meet ) आहे. मुंबईतील शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे सायंकाळी सात वाजता ही बैठक होणार आहे. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar ) , मंत्री छगन भुजबळ ( Minister Chhagan Bhujbal ) , राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल ( NCP Leader Prafull Patel ) आदींसह राष्ट्रवादीचे मंत्री व प्रमुख नेते उपस्थित आहेत. बैठक झाली.
होणार महत्वाची चर्चा
पाच राज्यांच्या निकालात भाजपला चार राज्यात बहुमत मिळाले आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर पक्षाच्या भूमिकेत काही बदल राष्ट्रवादीकडून केले जाऊ शकतात. यासह राज्यात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह विद्यमान मंत्री नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून धाडी टाकण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
गृहमंत्री, शरद पवारांची गुप्त बैठक
या बैठकीच्या आधी सायंकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ( Yashwantrao Chavhan Pratishthan Mumbai ) येथे शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची गुप्त बैठक पार पडली.