मुंबई - करोना रुग्णसंख्या सध्या बऱ्याच प्रमाणात घटल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लागू केलेले कोरोना संबंधीत निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याची भूमिका राज्य सककारने घेतली आहे. हा निर्णय येत्या १ ऑगस्टपासून लागू होणार आहे. नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स समितीची बैठक बोलावली असून, राज्यातील रुग्ण स्थितीचा आढावा घेऊन निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते. दुकानांच्या वेळा आणि सर्वसामान्य मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल प्रवेशाचाही यावेळी विचार केला जाणार आहे.
निर्बंध होणार शिथील?
कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. दिल्ली, कर्नाटक आदी राज्यांनी निबंध शिथिल केले आहेत. राज्यात रुग्णसंख्या आणि कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी झाल्याने, निर्बंध शिथिल केले जावेत, अशी मागणी बहुतेक मंत्र्यांनी केली. यानुसार येत्या १ तारखेपासून सध्या लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले जातील. सध्या सायंकाळी ४ पर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवाणगी आहे. ही वेळ सायंकाळी ७ पर्यंत वाढविली जाण्याची शक्यता आहे. करोना रुग्णांची संख्या अधिक असलेले जिल्हे वगळता इतर ठिकाणी निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. तसेच, शाळा-महाविद्यालये, मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा लसींच्या दोन मात्रा घेतलेल्यांना सुरू करण्याचा विचार होण्याची शक्यता आहे.
टास्क फोर्स समितीची बैठक बोलावली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टास्क फोर्स समिती, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी आज चर्चा करून निर्बंध शिथिली करण्याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे. लोकल प्रवासाची टांगती तलवार राज्यातील कोरोना स्थितीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्स समितीची बैठक बोलावली आहे. निर्बंध शिथील करण्याचा निर्णय होईल. मात्र, लोकल प्रवासाची मागणी होत असली तरी, लगेचच प्रवासाला अनुमती मिळण्याची शक्यता कमीच आहे, असे नगरविकास मंत्री शशिकांत शिंदे यांनी सांगितले.