ETV Bharat / city

Shiv Sena : संजय राऊतांना ईडी कोठडी; 'या' दोन दिग्गज नेत्यांवर शिवसेनेची बाजू मांडण्याची जबाबदारी - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली( ED Custody Of Sanjay Raut ) . त्यांना अटक करम्यात आली. त्यामुळे आता शिवसेनेची बाजू मांडणार कोण हा प्रश्न शिवसेनेसाठी महत्वाचा आहे. त्यावर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बुधवारी बोलवली आणि त्यावर तोडगा काढला. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे ( Legislative Council Deputy Speaker Neelam Gorhe )आणि अरविंद सावंत यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.

Neelam Gorhe
Neelam Gorhe
author img

By

Published : Aug 4, 2022, 9:49 AM IST

मुंबई - महाराष्ट्राचा अपमान सातत्याने राज्यपाल भगतसिंग कोशारी ( Governor Bhagat Singh Koshari ) करत आहेत. त्यांच्या विरोधात राज्यामध्ये मोठा असंतोष जनतेमध्ये उफाळून आलेलाच होता. आणि महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये जो रोष उत्पन्न झाला होता. त्यावरून लक्ष भरकटावे म्हणून सामनाचे संपादक शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली ( ED Custody Of Sanjay Raut ) अशी टीका शिवसेनेच्या नेत्यांनी केली होती. तसेच विरोधी पक्षांनीदेखील याबाबत राज्यपालांवर जोरदार टीका केली होती. समाना संपादक पोलीस कोठीत आहेत. तेव्हा शिवसेनेची बाजू माध्यमासमोर जनतेत कोण मांडणार हि चिंता सेनेच्या कार्यकर्त्यामध्ये होती. मात्र अरविंद सावंत ( Arvind Sawant ) आणि नीलम गोऱ्हे यांच्याकडे आता ती जबाबदारी सोपवली आहे. तसा दुजोरा नीलम गोऱ्हे यांनी ईटीव्ही भारतसोबत माहिती देताना दिला आहे.

शिवसेनेकडून टीका - आता संजय राऊत पोलीस कोठडीमध्ये असल्यामुळे शिवसेनेची बाजू मांडणार कोण हा प्रश्न शिवसेनेसाठी महत्वाचा होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बुधवारी बोलवली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर आता पक्षाची पूढची भूमिका कशी असेल तसेच भाजपला शह देण्यासाठी काय रणनिती असायला हवी. यावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आल्याचे समजते. या बैठकीनंतर खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सातत्याने राज्याचा अपमान करत आहेत. त्यांच्याविरोधात असंतोष आहे. तो असंतोष दडपण्यासाठी संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली. आम्ही प्रवक्ते आहोत, आता काही पोपट झालेत जे रोज काहीतरी बोलत असतात. मूळ मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यपालांनी राज्याचा अपमान केला आहे. जाती-जातींमध्ये दुही पसरवण्याचे काम त्यांनी केले. याबद्दल चर्चा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राऊत यांना अटक झाली आणि मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न झाला. राऊत यांच्या अटकेमुळे महत्त्वाची बातमी झाकली गेली असे सावंत म्हणाले.

पक्षाची भूमीका मांडणार - सेनेची भूमिका मांडण्यासाठी खासदार अरविंद सावंत तसेच उपसभापती पदाचा अनुभव असलेल्या आमदार नीलम गोऱ्हे यांच्यावर पक्षाने जवळजवळ जबाबदारी सोपवल्याचे समजत आहे. यासंदर्भात नीलम गोऱ्हे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ई टीव्ही भारतला माहिती दिली की, ''अधिकृतपणे अद्याप तसे काही झाले नाही. पण सर्व ते मानून चाललेले आहेत. अरविंद सावंत असतील अन्यथा मी, असतील त्यांनी या संदर्भात बाजू लावून धरावी. भूमिका बोलावी. अर्थात उपसभापतीच्या पदाच्या संदर्भात अनेक मर्यादा असतात आणि त्या मर्यादांचे पालन करावे लागते. त्याचे पालन करत पक्षाची बाजू तर प्रत्येक ठिकाणी सांभाळावी लागणारच आहे आणि सगळ्यांनी त्या संदर्भात एक मनोमन धरून चालले आहे कि मी भूमिका मांडावी. त्यामुळे जी काही जबाबदारी असेल ती नेटाने पार पाडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी ई टीव्ही भारतला सांगितले. त्यामुळे येत्या काळात मुंबई महानगरपलिका निवडणूका तसेच राज्यात अनेक जिल्हापरिषद निवडणूका आहेत. त्यात दोन्ही नेते हि जबाबदारी पेलत शिवसेनाला उभारी देण्याचा प्रयत्न करतील हे नक्की.

हेही वाचा - Sanjay Raut : संजय राऊतांची ईडी कोठडी आज संपणार; बेल की जेल?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.