मुंबई - गंगुबाई काठियावाडी ( Gangubai Kathiawadi ) हा चित्रपट थोड्याच दिवसांत प्रदर्शित होईल. मात्र, या चित्रपटावर कामाठीपुरातील रहिवासी नाराज असून 'चित्रपटातून होणारी कामाठीपुराची बदनामी थांबवा' अशी आर्त हाक ( Gangubai Kathiawadi Controversy ) कामाठीपुरावासीयांनी दिली आहे.
कामाठीपुरा हा मजूर कष्टकरी लोकांचा परिसर, कामगारांची वस्ती म्हणून याला सुरुवातीला कामाठी बोललं जायचं. पुढे कामाठी वस्ती न बोलता परिसर (पुरी) चं पुरा झालं. तिथून या परिसराला कामाठीपुरा हे नाव पडलं.
वेश्या व्यवसायाचा परिसर अशी कामाठीपुराची ओळख -
मजुरांच्या या वस्तीत सुरुवातीला थोड्या प्रमाणात वेश्या व्यवसाय सुरू होता. काळाच्या ओघात तो वाढत गेला. त्यामुळं या परिसराची ओळख कामगारांची वस्ती वरून वेश्या महिलांचे ठिकाण अशी झाली.
कामाठीपुरा बदलतोय -
कामाठीपुरातील स्थानिक सांगतात की, "कामाठीपुऱ्यात एकूण 49 गल्ल्या आहेत. सुरुवातीला या 49 गल्ल्या पैकी जवळपास सात ते आठ गल्ल्यांमध्ये हा व्यवसाय चालायचा. मात्र, काळ बदलला आणि हा व्यवसाय देखील कमी झाला. सध्याच्या घडीला इथे फक्त तीन ते चार गल्ल्यांमध्येच हा व्यवसाय चालतोय."
बदनामी थांबवा -
इथल्या स्थानिक महिला सांगतात की, कोणताही चित्रपट घेतला त्या चित्रपटात कामाठीपुराची ओळख ही केवळ वेश्या व्यवसाय म्हणून दाखवली जाते. मात्र, या भागात अनेक कुटुंब राहतात आम्ही देखील त्यातलेच आहोत. मात्र, याचा अर्थ असा होत नाही की आम्हीदेखील वेश्या आहोत. चित्रपटांमधून होणारी आमच्या भागाची आमच्या वस्तीची बदनामी थांबवा." अशी आर्त हात कामाठीपुरा वासीयांनी दिली आहे.
हेही वाचा - Devendra Fadnavis on Nawab Malik Arrest : नवाब मलिक यांनी दहशतवाद्याकडून जमीन खरेदी करण्याचे कारण काय - देवेंद्र फडणवीस