ETV Bharat / city

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण लॉटरी डिसेंबरपर्यंत, निवडणूक नियोजित वेळेतच - मुंबई महानगरपालिका

मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च २०२२ पर्यंत असून फेब्रुवारीत निवडणूक अपेक्षित आहे. सन २०१७ मध्ये २१ फेब्रुवारीला निवडणूक झाली होती. मुंबईत कोरोनाच्या संकटामुळे वाढलेली कोरोना रुग्णसंख्या व तिस-या लाटेच्या शक्यतेमुळे निवडणूक प्रक्रिया नियोजित वेळेत होणार नाही व निवडणूक पुढे ढकलण्यात येईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता कोरोना नियंत्रणात असल्याने निवडणूक घेण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासन आणि निवडणूक आयोगाने आपली तयारी सुरू केली आहे.

मुंबई महानगरपालिका
मुंबई महानगरपालिका
author img

By

Published : Nov 11, 2021, 1:00 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ (Mumbai Municipal Corporation elections) ला होत आहे. त्यासाठी प्रभाग पुनर्रचना करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रभाग पुनर्रचनेला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. आरक्षण लॉटरीही प्रलंबित आहे. आराखडा मंजुरी आणि आरक्षण लॉटरीची प्रक्रिया (Reservation lottery process) डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल. मात्र असे असले तरी मुंबई महापालिकेची निवडणूक नियोजित वेळेतच होणार असल्याचा दावा राज्य निवडणूक आयोगाने केला आहे.

निवडणुकीची तयारी सुरू -

मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च २०२२ पर्यंत असून फेब्रुवारीत निवडणूक अपेक्षित आहे. सन २०१७ मध्ये २१ फेब्रुवारीला निवडणूक झाली होती. मुंबईत कोरोनाच्या संकटामुळे वाढलेली कोरोना रुग्णसंख्या व तिस-या लाटेच्या शक्यतेमुळे निवडणूक प्रक्रिया नियोजित वेळेत होणार नाही व निवडणूक पुढे ढकलण्यात येईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता कोरोना नियंत्रणात असल्याने निवडणूक घेण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासन आणि निवडणूक आयोगाने आपली तयारी सुरू केली आहे. पालिकेने मुंबईतील २२७ प्रभागांच्या पुनर्रचनांचा कच्चा आराखडा बनवून तो मागील महिन्यात आयोगाकडे पाठवला आहे. मात्र आता राज्य सरकारने पालिकेतील नगरसेवकांची संख्या ९ ने वाढवली आहे. यामुळे आता नगरसेवकांची संख्या २३६ झाली असल्याने निवडणूक आयोगाला २३६ प्रभागांसाठी पुनर्रचना आराखडा बनवावा लागणार आहे.

कोरोनामुळे तयारी धिम्या गतीने -

गेल्या सन २०१७ मध्ये पालिकेची १४ वी सार्वत्रिक निवडणूक २१ फेब्रुवारी रोजी झाली. या निवडणूकीचा निकाल २३ फेब्रुवारीला जाहीर झाला होता. सप्टेंबरमध्ये प्रभाग आराखडा प्रसिद्ध होऊन तीन ऑक्टोबर २०१७ रोजी आरक्षण लॉटरी काढण्यात आली होती. मात्र कोरोनामुळे २०२२ च्या निवडणुकीची तयारी धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे यावेळी नियोजित वेळेनुसार निवडणूक होणार की नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने सार्वत्रिक निवडणूक नियोजित वेळेत होणार असल्याचे आयोगाने संकेत दिले आहेत.

प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण -

पालिकेने पाठवलेल्या प्रभाग पुनर्रचनेच्या प्रारूप आराखड्यावर आयोगाची तपासणी सुरू आहे. आराखड्यात आयोगाची निरीक्षणे नोंदवली जातील. या निरीक्षणांच्या सुधारणांसाठी आराखडा पुन्हा पालिकेकडे पाठवला जाईल. पालिका सुधारित आराखडा आयोगाला पाठवेल. आयोगाच्या मंजुरीनंतर पालिका तो प्रसिद्ध करेल. त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात येतील. त्यावर नागरिक व राजकीय पक्षांनी घेतलेल्या हरकतींवरील सुनावणीसाठी आयोग आपला अधिकारी नियुक्त करेल. या प्रक्रियेतून आराखड्याला अंतिम मंजुरी मिळेल. या दरम्यानच्या काळात आरक्षण लॉटरी देखील काढली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.