मुंबई: दादर पूर्व मधील पारसी जिमखाना समोरील १२०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास फुटली होती. जलवाहिनी दुरुस्तीसाठी दोन दिवसाचा कालावधी लागला. शनिवारी सकाळपासून पाणीपुरवठा सुरळीत (water supply) करण्यात आला.
याभागात होणार सुरळीत पाणीपुरवठा: पालिकेच्या जल अभियंता विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी युद्धपातळीवर काम करत जल वाहिनीची दुरुस्ती केल्याने, दादर पूर्व (Dadar East), माटुंगा, वडाळा, पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी, दादर, नायगाव, लालबाग, वडाळा, परळ, काळाचौकी, शिवडी भागातील पाणी पुरवठा सुरळीत सुरू झाला आहे.
जलवाहिनी फुटल्याने ओढावली परिस्थिती : जलवाहिनी जुनी झाल्याने फटून गळती लागली होती. ही बाब निदर्शनास येताच महापालिकेच्या वतीने दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले.
हेही वाचा: Mumbai Water Reduction : पाणी कपातीमुळे मुंबईकरांचे हाल, प्रशासकांनी तोडगा काढावा - रवी राजा
हेही वाचा: Mumbai Rain : पालिकेच्या 'या' उपाययोजनामुळे यंदा 'मुंबईची तुंबई' नाही; मुख्यमंत्र्यांनीही केलं कौतुक
हेही वाचा: Mumbai Water Reduction : पाणी कपातीमुळे मुंबईकरांचे हाल, प्रशासकांनी तोडगा काढावा - रवी राजा