ETV Bharat / city

राज्यात खाजगी वाहनांच्या नोंदणी १ मेपर्यंत बंद

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून राज्यात खाजगी वाहनांच्या नोंदणीस १ मेपर्यंत स्थगिती देण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत. या आदेशानुसार, नव्याने वितरित होणारे लर्निंग व ड्रायव्हिंग लायसन्सची प्रक्रियाही ३० एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

राज्यात खाजगी वाहनांच्या नोंदणी १ मेपर्यंत बंद
राज्यात खाजगी वाहनांच्या नोंदणी १ मेपर्यंत बंद
author img

By

Published : Apr 24, 2021, 1:44 AM IST

मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून राज्यात खाजगी वाहनांच्या नोंदणीस १ मेपर्यंत स्थगिती देण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत. या आदेशानुसार, नव्याने वितरित होणारे लर्निंग व ड्रायव्हिंग लायसन्सची प्रक्रियाही ३० एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पुढील आदेश येईपर्यंत आरटीओंमध्ये अभ्यांगतांना प्रवेश मिळणार नसल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

लर्निंग व ड्रायव्हिंग लायसन्स देणे थांबवा -
राज्यात कोरोनारुग्ण संख्याी दिवसेंदिवस वाढत जात आहे. या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्य सरकारने 1 मे 2021पर्यंत कडक निर्बंध लागू केले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून राज्याच्या परिवहन विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवेतील वाहनांच्या नोंदणीस आरटीओंना प्राधान्य देण्यास सांगितले आहे. खाजगी वाहनांच्या नोंदणीस १ मे पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

प्रलंबित कामे मार्गी लावणार-
परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र शासनाने ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत ३० जूनपर्यंत वाढवलेली आहे. त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स नुतनीकरण व नक्कल प्रत मिळवण्यासाठी अर्ज केलेल्या चालकांना कोणतीही अडचण येणार नाही. याआधीच वाहन नोंदणीसाठी अर्ज केलेल्या वाहनांची नोंदणी पूर्ण होणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. पुढील ८ दिवस राज्यातील आरटीओंमध्ये प्रलंबित कामे मार्गी लावण्यात येणार आहेत.

हेही वाचा - राज्यातील सर्व रुग्णालयांचे होणार ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन ऑडिट’; मुख्य सचिवांचे निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.