ETV Bharat / city

कोरोनामुळे विमानाद्वारे होणाऱ्या मालवाहतुकीत विक्रमी घट; देशांतर्गत मालवाहतूक 49.50 टक्के घटली

भारतासह संपूर्ण देशात गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये म्हणून, विमानाद्वारे  मालवाहतूक सुरू होती.

aircraft cargo
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 30, 2021, 8:03 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जागतिक वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात विमानाद्वारे मालवाहतूक सुरू असतानासुद्धा गेल्या एका वर्षात मालवाहतुकीत मोठी घट झाली आहे. देशांतर्गत 49.50 टक्के तर मुंबई विमान तळावरून होणाऱ्या मालवाहतुकीतही तब्बल 35.30 टक्के घट झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा - 'ते ट्विट करून कोणाचे प्रवक्ते आहेत हे संजय राऊतांनी सिद्ध केले'

हवाई मालवाहतुकीला फटका-

भारतासह संपूर्ण देशात गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये म्हणून, विमानाद्वारे मालवाहतूक सुरू होती. मात्र, संपूर्ण जगातील कोरोनामुळे आर्थिक उद्योग आणि व्यापार बंद असल्याने मालवाहतुकीवरसुद्धा विपरीत परिणाम झालेला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नुकताच आपला अहवाल जाहीर केलेला आहे. या अहवालानुसार एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत भारतात देशांतर्गत विमानाद्वारे वाहतुकीत 49.50 टक्के घट झालेली आहे. तर मुंबई विमानतळावरून होणाऱ्या मालवाहतुकीतही तब्बल 35.30 टक्के घट झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे नुकसान झाले आहे.

देशांतर्गत प्रवासी वाहतूक 51 टक्क्यांनी घसरली-

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठी घट झाली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना, देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात 63 लाख 54 हजार प्रवाशांनी देशांतर्गत विमान प्रवास केलेला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवाशांची संख्या 51 टक्क्यांनी घसरली आहे.

हेही वाचा - कर्नाटकचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.