मुंबई- शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गुवाहाटीमधील हॉटेलमधून बाहेर पडले आहेत. उद्या मुंबईला उद्या परतणार, बहुमत सिद्ध करणार असल्याचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीत माध्यमांशी बोलताना सांगितले. महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाच्या राजकीय ( Rebel Shivsena Leader Eknath Shinde ) हालचाली वाढल्या आहेत.
माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, की सर्व आमदारांनी आनंदाने दर्शन घेतले. कोणत्याही आमदाराला जबरदस्तीने आणललेले नाही. आमच्याकडे ५४ आमदार आहेत. छत्रपती शिवराय आणि धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करणार आहे. बहुमत चाचणीनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन करणार आहोत. धर्मवीर गीते व बाळासाहेब यांच्या विचारांना पुढे नेणारी शिवसेना आहे. आम्ही उद्या मुंबईत पोहोचू. 50 आमदार आमच्यासोबत आहेत. आमच्याकडे 2/3 बहुमत आहे. आम्हाला कोणत्याही फ्लोअर टेस्टची चिंता नाही. आम्ही सर्व गोष्टींमध्ये उत्तीर्ण होऊ आणि आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. लोकशाहीत बहुमत महत्त्वाचे असते. आमच्याकडे बहुमत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मुळे राज्यातील सत्ता स्थापनेला वेग आला असून, घडामोडी फार वेगाने होताना दिसत आहेत. मंगळवारी ( 28 जून ) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस व भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आज ( 29 जून ) राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं ( bhagatsingh koshyari sent letter cm uddhav thackeray ) आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे ठाकरे सरकारला तातडीने बहुमत सिद्ध करायला लावण्याच्या मागणीचे पत्रं ( Maharashtra Political crisis ) दिले. फडणवीस यांनी म्हटले होते आहे की, आज राज्यपालांना आम्ही ईमेलद्वारे व प्रत्यक्ष भेटून पत्र दिलेले आहे. सध्या राज्याची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शिवसेनेच्या ३९ आमदारांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहायचं नाही आहे. त्या कारणासाठी ते महाविकास आघाडी किंवा सरकारमधून बाहेर पडत आहेत. त्यामुळे हे सरकार अल्पमतात आलेल आहे. ठाकरे सरकारकडे बहुमत नाही. यासाठी राज्यपालांनी बहुमत चाचणी घ्यावी, अशी त्यांना विनंती केली आहे.
ठाकरे सरकारकडे बहुमत नाही - देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राज्यपालांकडे ठाकरे सरकारला तातडीने बहुमत सिद्ध करायला लावण्याच्या मागणीचे पत्रं दिले. फडणवीस यांनी म्हटले आहे की, आज राज्यपालांना आम्ही ईमेलद्वारे व प्रत्यक्ष भेटून पत्र दिलेले आहे. सध्या राज्याची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शिवसेनेच्या ३९ आमदारांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहायचं नाही आहे. त्या कारणासाठी ते महाविकास आघाडी किंवा सरकारमधून बाहेर पडत आहेत. त्यामुळे हे सरकार अल्पमतात आलेल आहे. ठाकरे सरकारकडे बहुमत नाही. यासाठी राज्यपालांनी बहुमत चाचणी घ्यावी, अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे.