मुंबई - मुंबईतील पत्राचाळ प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ( Shiv Sena leader MP Sanjay Raut ) भांडूप येथील घरी आज ईडीने धडक देत कारवाईला सुरुवात केली. ईडीने यापूर्वी दोनदा संजय राऊत यांना समन्स बजावले होते. संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने राऊत त्यांनी वेळ मागवून घेतली ( ED Raid at Sanjay Raut home ) होती. मात्र सकाळपासूनच कारवाईला सुरुवात केल्याने राऊत यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आक्रमक शिवसैनिक आणि महाविकास अघाडीमधले अनेक नेते आक्रमक झाले आहेत. त्याशिवाय भाजप नेत्यांकडूनही या कारवाईवरून भावना व्यक्त होत आहेत.
लढत राहीन - राहत्या निवासस्थानी छापा पडल्यानंतर संजय राऊतांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रीया दिली. जास्त काही न बोलता अगदी थोडक्या शब्दात संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईवर आपल्या भावना व्यक्त केल्या ( Sanjay Raut Reaction On ED Raid ) आहेत. शिवसेना झिंदाबाद!!!लढत राहीन.. ( Long live of Shiv Sena Will keep fighting ) असं म्हणत त्यांनी आपले मत व्यक्त केले. आज सकाळपासून संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीची कारवाई सुरू आहे.
लोकशाहीच्या विदारक अवस्थेचे चित्र - "संजय राऊत यांच्या घरावर पोहोचलेली ED लोकशाहीच्या विदारक अवस्थेचे चित्र दर्शवत आहे. भाजपाला विरोधाचा आवाज पूर्ण बंद करायचा आहे. ED तपास यंत्रणा नसून आवाज दमन अस्त्र आहे. भाजपात गेल्यावर या अस्त्रापासून संरक्षण मिळते. संजय राऊत यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. जनतेचा लढा आहे, लढत राहू!" अशी प्रतिक्रीया सचिन सावंत यांनी दिली ( Sachin Sawant Reaction On ED Raid )आहे.
भाजपशी जुळवून घेण्यासाठी दबाव - सावंत म्हणाले की, संजय राऊत यांनी पत्राचाळ प्रकरणात अनेकदा भूमिका स्पष्ट केलेले आहे. पत्राचाळ कुठे आहे हे देखील मला माहित नसल्याचे राऊत यांनी म्हटले होते. तसेच लोकसभेचे अधिवेशन सुरू असल्याने ते चौकशीला उपस्थित राहू शकले नाहीत. अधिवेशन संपल्यानंतरची तारीख मागितली होती. यापूर्वीही दोन-तीन वेळा राऊत चौकशीला सामोरे गेले होते. चौकशीला सामोरे जात नाहीत असे म्हणणे चुकीचे आहे. मात्र महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर संजय राऊत भूमिका मांडत असतात ( Sanjay Raut takes stand on political situation ). त्यांच्या विरोधात राजकीय सूडबुद्धीने त्यामुळे कारवाई केली जात आहे. अनेकांचा त्यांच्यावर राग आहे. हा राग काढण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होतोय, असा आरोप शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. राजकीय परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपशी जुळवून घ्यावे, यासाठी दबाव टाकला जात असल्याचे सावंत म्हणाले ( pressure to align with bjp ).
राऊतांमुळे शिवसेनेतून नेते बाहेर - संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भोंग्यामुळे शिवसेनेत फूट पडली. सामान्य शिवसैनिकासह 40 आमदार आणि 12 खासदार सेनेतून बाहेर पडले. आता ते आनंदी असतील अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केली. राऊत यांच्याकडे प्रखर वाणी आणि लेखणीवर आहे, त्याआधारे त्यांनी स्वत: ची सुटका करून घ्यावी, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. आमचं पोस्टमार्टेम करायला निघालेल्या संजय राऊत यांचं पोस्टमार्टेम तपास यंत्रणांनी सुरू केले असल्याचे शिरसाट यांनी म्हटले.
संजय राऊत यांना हिशोब तर द्यावा लागेल - ईडीच्या अधिकारी पालन करत आहेत. संजय राऊत यांना हिशोब तर द्यावा लागेल. बाराशे कोटीचा पत्राचाळ घोटाळा असू दे किंवा वसई नायगाव येथील पीएसएनएल येथील बिल्डरचा घोटाळा असो, माफियागिरी असो, दादागिरी असो प्रत्येकाला जेलमध्ये पाठवायची धमकी देणाऱ्या हिशोब द्यावा लागेल. महाविकास आघाडीचा महाराष्ट्र लुटण्याचा जो प्रयत्न सुरू होता. आता सगळ्याचा हिशोब तर संजय राऊत यांना द्यावाच लागेल. संजय राऊतांवरील कारवाईमुळे महाराष्ट्रातील जनतेला आनंद झाल्याचे सोमय्या म्हणाले.