ETV Bharat / city

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : विरोधक आक्रमक, तर सत्ताधारी म्हणतात मंत्र्याचे नाव जोडणे चुकीचे - eknath shinde

पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. या प्रकरणाशी शिवसेनेच्या नेत्याचा संबंध असल्याचे पुढे येत असतानाच, भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी थेट मंत्री संजय राठोड यांचे नाव जाहीर करत कारवाईची मागणी केली. तसेच राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

पूजा चव्हाण
पूजा चव्हाण
author img

By

Published : Feb 13, 2021, 1:47 PM IST

Updated : Feb 13, 2021, 5:02 PM IST

मुंबई - बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथील 22 वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणी राजकारण तापू लागले आहे. या आत्महत्येच्या घटनेनंतर विविध माध्यमांमध्ये तसेच समाजमाध्यमांवर त्या तरुणी संदर्भातील काही ऑडिओ क्लीप्स व्हायरल झाल्या आहेत. त्यानंतर तिच्या आत्महत्येशी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचा संबंध असल्याचा आरोप भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनीही अप्रत्यक्षपणे संजय राठोड यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

या आत्महत्या प्रकरणानंतर बंजारा समाजात देखील प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण आहे. या प्रकरणात सर्वंकष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांकडे पत्रातून केली आहे. तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे, मात्र, अद्याप मुख्यमंत्री अथवा गृहमंत्री यांनी कोणीच चौकशीचे आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणावर दिरंगाई केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ईटीव्ही भारतने राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाचा घेतलेला आढावा.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण - चित्रा वाघ

वाट कसली पाहता, मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा - भाजप नेत्या चित्रा वाघ

पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. महाविकास आघाडीतील एका मंत्र्यामुळे या तरुणीने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे आणि यासंदर्भातील काही ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पूजा चव्हाण केसमध्ये मोबाईलचा मोठा पुरावा आहे. मोबाईलमध्ये झालेल्या संभाषण क्लीप्स मिळाल्या आहेत. ज्यात तिला आत्महत्येस परावृत्त करण्यापासून तर आत्महत्या झाल्यानंतर तिचा मोबाईल ताब्यात घेण्यापर्यंतच्या सुचना मंत्र्याकडून होताना सगळ्यांनी ऐकल्या आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

या सर्व प्रकरणाबाबत पोलिस कोणताच पवित्रा किंवा काहीही स्पष्टता देत नाही. पूजा चव्हाणच्या परिवारावर दबाव असू शकेल पोलिस अशा केसेसमध्ये स्यु-मोटो दाखल करुन घेऊ शकतात हे मी आपल्याला सांगायला नको. अर्थात त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्वाची आहे. मुख्यमंत्री महोदय, एवढे पुरावे असतांना मुसक्या आवळायाच्या सोडून कसली वाट बघताय?' असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. माझ्या मुलीच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी झाली पाहिजे, एवढीच मागणी पूजाच्या कुटूंबीयांची आहे. त्यानंतर आता भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्याच्या गृहमंत्र्यांवर टीका केली आहे.

तर कारवाई होईलच - अजित पवार

या आत्महत्या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता, त्यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले, 'या प्रकरणाची चौकशी पोलीस विभागाकडून सुरू आहे. चौकशीत काही गोष्टी समोर आल्यास पुढे कारवाई होईल.'

देवेंद्र फडणवीसांनी पोलीस महासंचालकांना लिहले पत्र-

पोलिस महासंचालकांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, स्व. पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्याप्रकरणातील काही ऑडिओ क्लिप्स सुद्धा समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. अशा एकूण 12 ऑडिओ क्लिप्स माझ्या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. आपल्या अवलोकनार्थ त्या ऑडिओ क्लिप्सची प्रत या पत्रासोबत जोडत आहे. या ऑडिओ क्लिप्समध्ये बोलणारे कोण आहेत, त्यांच्या संवादाचा नेमका अर्थ काय, त्यातून स्व. पूजा चव्हाणची खरोखर आत्महत्या आहे की तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. एकूणच तिच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण यामुळे निर्माण होत आहे. सध्याचा तपास हा वरकरणी होत असल्याचे खेदाने नमूद करावेसे वाटते. ही आत्महत्या किंवा आत्महत्येमागील घटनाक्रम संशयास्पद असल्याचा आरोप त्यामुळे बंजारा समाजातून मोठ्या प्रमाणात होतो आहे. त्यामुळे या सर्व ऑडिओ क्लिप्सची सखोल आणि सर्वंकष चौकशी होणे नितांत गरजेचे आहे. ही चौकशी तत्काळ करून बंजारा समाजात अतिशय लोकप्रिय असलेल्या या तरुणीला तत्काळ न्याय द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण

धक्कादायक घटना, सखोल चौकशी करा- पंकजा मुंडे

परळी मतदारसंघाच्या माजी आमदार पंकजा मुंडे यांनी देखील टि्वट करत 'पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरूणीचा मृत्यू ही बातमी अतिशय धक्कादायक आहे. या तरुणीच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे.

राज्य सरकारवरचा विश्वास उडेल - चंद्रकांत पाटील

पूजा चव्हाण प्रकरणातही जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींनी कारवाई केली नाही तर महिलांचा राज्य सरकारवरचा विश्वास उडेल,अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

विरोधक आक्रमक, तर सत्ताधारी म्हणतात मंत्र्याचे नाव जोडणे चुकीचे

गुन्हेगाराला लवकरात लवकर शिक्षा व्हावी - बबनराव लोणीकर

राज्यातल्या महिल्या व मुली सुरक्षित नाही. राज्यात दररोज महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. सरकार काय करत आहे. सरकार बलात्काऱ्यांना पाठिशी घालत आहे. पोलिसांनी तातडीने तपास करून गुन्हेगाराला शिक्षा करण्याची मागणी भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी केली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण

मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडणे योग्य नाही - एकनाथ शिंदे

झालेली घटना दुर्दैवी आहे. मात्र, या घटनेत थेट एखाद्या मंत्र्यांचे नाव घेणे उचित नाहीष अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पूजा चव्हाण या आत्महत्या प्रकरणी राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सावध भूमिका घेतली आहे. प्रकरण अतिशय संवेदनशील असून यावर सखोल चौकशी होईल आणि त्या चौकशीअंती माहिती समोर आल्यावर, या विषयावर बोलणे योग्य राहील, तोपर्यंत या विषयावर काहीही भाष्य करणं चुकीचं असेल अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

एखाद्या मंत्र्याचे थेट नाव घेण्याची गरज नाही, थोडे संयमाने घेण्याची गरज- जयंत पाटील

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात जयंत पाटील यांनी मला वस्तुस्थिती माहिती नसल्याचे सांगताना, या प्रकरणात एखाद्या मंत्र्याचे थेट नाव घेण्याची गरज नसल्याचे मला वाटते. पाठीमागच्या काळातील घटना पाहिल्या की लक्षात येईल एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याची व्यवस्था लगेच केली जाते. त्यामुळे थोडे संयमाने घेण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- आमदार भातखळकर

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी संबंधित काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. "या प्रकरणात समोर आलेल्या ऑडिओ क्लीप ताब्यात घेतल्या पाहिजेत. त्या ऑडिओ क्लिप फॉरेन्सिककडे पाठवून तो आवाज कोणाचा आहे? हे तपासलं पाहिजे. लॅपटॉही स्कॅन केला पाहिजे. या सर्व तपासाच्या गोष्टी असून, गुन्हेगारांना वाचवण्याचं पाप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करताहेत" असा गंभीर आरोप करत भातखळकर यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

विविध संघटनांकडूनही चौकशीची मागणी-

पुणे पोलिसांनी या युवतीच्या आत्महत्येबाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणी करत भाजप महिला आघाडीच्यावतीने पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना याबाबत निवेदन देण्यात आलं आहे.

तसेच पूजा चव्हाणला न्याय मिळवून देण्यासाठी बंजारा समाजाने रस्त्यावर उतरावे, या आंदोलनाचे नेतृत्व आपण करू असे आवाहन शेतकरी नेते तथा विमुक्त घुमंतू जनजाति महासभा प्रदेश अध्यक्ष मनीष जाधव यांनी बंजारा समाजाला केले आहे.

सोशल मीडियावर मंत्र्यांच्या समर्थनार्थ स्टेस्ट्स -

पुण्यातील पूजा जाधव हिच्या मृत्यू प्रकरणी राजकीय वादळ उठले आहे. अशातच यवतमाळ जिल्ह्यात सोशल मीडियावर मंत्री यांच्या समर्थनार्थ पोस्टर युद्ध रंगत आहे. 'आम्ही आमच्या राजासोबत', 'सिधा चेहरा, इतिहास गेहेरा' यासह फिल्मी स्टाईल डायलॉगबाजीचा उल्लेख पोस्टरमध्ये झळकत आहे. त्यामुळे आता विविध प्रकारच्या चर्चेला उधाण येत आहे.

'त्या' क्लिपमधील संभाषणातून संशयाची सुई

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी कथितरित्या संबंधित असलेल्या ऑडिओ क्लिप सोशल मीडियातून व्हायरल झाल्या आहेत. व्हायरल झालेल्या या क्लिप्समध्ये कथितरित्या राज्य सरकारमधील एक मंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यामधील संभाषणाचा समावेश आहे. यात दोघांचीही एका मुलीविषयी चर्चा होते. या संभाषणात आत्महत्येचाही उल्लेख ऐकायला मिळतो. त्यामुळे या क्लिप्सवरून कथित संवाद साधणाऱ्या व्यक्तीवर संशयाईची सुई रोखली जात आहे.

Last Updated : Feb 13, 2021, 5:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.